पनवेल शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पनवेल नगरपालिकेने गुरुवारी पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. सकाळी ११.३० वाजता फडके नाटय़गृहात करण्यात येणारी परिषद आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  नगरपालिकेतील  सदस्य शिवदास कांबळे यांनी ही परिषद घेण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्याकडे केली होती.  सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटय़ांचे प्रतिनिधींना या परिषदेचे निमंत्रण पत्र कांबळे यांनी पाठविले आहे.  सुमारे आठ हजार पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्याद्वारे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने ‘पाणी वाचवा’ मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत जनजागृतीसाठी चित्रफिती तयार केल्या आहेत. या चित्रफितींद्वारे घरामध्ये विविध कामानिमित्ताने होणारी पाणीगळती रोखून पाण्याची बचत कशी करता येऊ शकते, असा संदेश देण्यात येणार आहे.