22 July 2019

News Flash

‘तेजस्विनी’साठी महिला चालकच नाहीत

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या बसेस घेण्यात आल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

महिला विशेष बसे पुरुष चालकांच्याच हातात

नवी मुंबईतील महिला प्रवाशांना एनएमएमटी प्रशासनाने महिलादिनी भेट देत तेजस्विनी या महिला विशेष बस सुरू केल्या. या बसचे चालक वाहकही महिलाच असतील, असे परिवहनने जाहीर केले होते. मात्र एनएमटीकडे फक्त दोनच महिला चालक उपलब्ध असल्याने या बसेस पुरुष चालकच चालवत आहेत.

गर्दीच्या वेळी महिलांना सुखकर प्रवास करता यावा म्हणून या १० तेजस्विनी महिला विशेष बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या बसेस घेण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकडे ९०८ चालक व ११८० वाहक आहेत. यात फक्त दोनच महिला चालक असून ५० पेक्षा अधिक महिला वाहक आहेत. १० तेजस्विनी बसेस नवी मुंबईतील सात मार्गावर सुरू करण्यात आल्या असल्या तरी दोनच चालक असल्याने बसेस पुरुष चालकांना चालवाव्या लागत आहेत.

याबाबत चित्रा शेळके या चालक महिलेने अधिकाधिक महिला चालकांनी उपक्रमात यायाला हवे, असे आवाहन केले आहे.

महिलांसाठीच्या तेजस्विनी बसेस सात मार्गावर धावत आहेत. परिवहन उपक्रमाकडे फक्त दोनच महिला चालक आहेत. महिला चालक नेमण्यासाठी उपाययोजना सुरू असून त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांची नेमणूक महिला विशेष बसेससाठी करण्यात येईल.

– रामचंद्र दळवी, सभापती परिवहन

First Published on March 16, 2019 12:36 am

Web Title: no womens crew for tejaswini