News Flash

पावसाळी शेडला परवानगी रद्द

शहराचे विद्रूपीकरण होत असल्याच्या तक्रारी आल्याने सध्या परवानगी दिली नाही.

 

पालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची माहिती

शहराचे विद्रूपीकरण होत असल्याच्या तक्रारी आल्याने पावसाळी शेडची परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

नगरसेविका मीरा पाटील यांनी व्यापाऱ्यांना व अन्य व्यावसायिकांना पावसाळी शेडला परवानगी देण्यात यावी अशी मागणी मागील सभेत केली होती, त्यावर काय निर्णय घेण्यात आला, अशी विचारणा केली असता या शेडना परवानगी न दिल्याने महापालिकेचा महसूल बुडत असून नागरिकांची गैरसोय होत आहे, असे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी पावसाळी शेड टाकण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करताना तो ढोबळ प्रकारे केला आहे. या शेडला किती मीटर परवानगी द्यावी हे स्पष्ट नाही. त्यामुळे कोणीही किती प्रमाणात व कशीही पत्रा व ताडपत्रीची शेड टाकत आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याच्या तक्रारी आल्याने सध्या परवानगी दिली नाही.

या संदर्भातील मंजुरीचा प्रस्ताव पुन्हा महासभेत आणला जाणार आहे. पावसाळी शेडच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाची सदस्यांनी काळजी करू नये, एलबीटी व मालमत्ताकराच्या माध्यमातून मनपाला चांगले उत्पन्न मिळत आहे. ज्यांनी कायमस्वरूपी शेड टाकल्या असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे, असे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:53 am

Web Title: not getting permission of rainy shade to traders in navi mumbai
Next Stories
1 बंदमुळे भाज्या उकिरडय़ावर
2 कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची कवायत
3 उरण ते मुंबई जलवाहतूक पूर्ववत
Just Now!
X