News Flash

घारापुरी किनारी तेलतवंग

उरण तालुक्यातील समुद्र किनारी सध्या तेलतवंगामुळे मासेवारीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे.

तेलतवंग पिरवाडी किनाऱ्यापर्यंत पसरला आहे.      छाया : जगदीश तांडेल

मासेमारीवर परिणाम; प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

उरण तालुक्यातील समुद्र किनारी सध्या तेलतवंगामुळे मासेवारीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे घारापुरी बेट किनारी हा तेलतवंग साठत असून त्याचा पर्यावरण विपरती परिमाण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  काही दिवसांपासून काळ्या रंगाच्या तेलाचा पाण्यावर असून नंतर तो संपूर्ण किनारपट्टीवर पसरत चालल्याचे येथील मच्छिमारांनी सांगितले. मासेमारीवर गुजराण करणाऱ्या कोळी बांधवांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, उरण तहसील कार्यालयाने याबाबतचा एक अहवाल तयार केला  आहे.

राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या घारापुरी बेटावर अरबी समुद्रात होणाऱ्या हालचालींचा नेहमीच परिणाम होत आला आहे. २००८ ला झालेल्या दोन जहाजांच्या धडकेमुळे किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात कचरा जमा झाला होता.

लाटांमुळे मुंबईच्या किनाऱ्यावरील कचरा या बेटाच्या किनाऱ्यावर येत असल्याने नागरिकांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दोन वर्षांपूर्वी स्फोटकांनी भरलेले ड्रमही येथे लागलेले होते.

सातत्याने निर्माण होणाऱ्या तेल तवंगामुळे बेटाची समुद्राच्या महाकाय लाटांपासून सुरक्षा करणाऱ्या खारफुटीचाही नाश होत असल्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रदूषणमुक्त किनारे करण्यासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण प्रेमी जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाची प्रतीक्षा

या संदर्भात उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी घारापुरी बेटावरील तेल तवंगाची पाहणी केली असून त्या संबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे समुद्रात मोठय़ा प्रमाणात जलवाहतूक होत असल्याने हे तेल तवंग येत आहेत. मात्र जोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या तवंगामुळे प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट होत नाही. तोपर्यंत प्रदूषण होत असल्याचे म्हणता येत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतरच प्रदूषणासंदर्भात स्पष्टता होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 12:55 am

Web Title: oil leak hits uran sea shore
Next Stories
1 खारघरमध्ये फेरीवाल्यांचे अतिक्रमण
2 सहावीतील मुलाची आत्महत्या
3 नवी मुंबईत गणेशपूजेला पुरोहित पुरेनात!
Just Now!
X