स्थानिक नगरसेवक, अधिकाऱ्यांची ‘युक्ती’

नवी मुंबईतील अनेक नोडमध्ये पालिकेच्या वतीने सध्या पदपथांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याची कामे सुरू आहेत. या नवीन कामात जुने पेव्हर ब्लॉक लावण्याची युक्ती कंत्राटदारांकडून लढविली जात असल्याचे सर्रास दिसून येत आहे. ऐरोली सेक्टर १४ मधील बर्न रुग्णालयाजवळ सुरू असलेल्या कामात असे जुने पेव्हर ब्लॉक स्वच्छ करून वापरण्यात आल्याचे आढळून आले आहे, तर हाच प्रकार कोपरखैरणे येथील सेक्टर १८ मधील कामातही दिसून आला आहे. विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवक व अधिकारी या जुन्या पेव्हर ब्लॉकचे सर्मथन करीत आहेत.

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

नवी मुंबईत पेव्हर ब्लॉकमागे मोठे अर्थकारण आणि राजकारण दडले आहे. त्यामुळे महालेखापरीक्षकांनीही पेव्हर ब्लॉकच्या या कामावर ताशेर ओढले आहेत. स्थानिक नगरसेवकांनी शिफारस करायची आणि कार्यकारी अभियंत्यांनी या कामाची तत्काळ निविदा काढायची, अशी एक कार्यपद्धत नवी मुंबईत गेली अनेक वर्षे प्रचलित आहे. शक्यतो ही कामे दहा लाख रुपये खर्चाच्या आतील काढल्याने त्याची माहिती स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेला द्यावी लागत नाही. त्यामुळे सध्या शहरातील अनेक भागात पेव्हर ब्लॉकची कामे सुरू आहेत. त्यातील ऐरोली सेक्टर १४ मधील काम मोठे लक्षवेधी असून या पदपथाचा कोणीही पादचारी उपयोग करीत नसताना गेले अनेक दिवस हे काम केले जात आहे. त्यासाठी सुस्थितीत असलेले पेव्हर ब्लॉक चार कर्मचारी लावून प्रथम काढण्यात आले. त्यानंतर हे पेव्हर ब्लॉक ट्रकमधून कारखान्यात नेण्यात आले. त्यानंतर आलेल्या गाडय़ांमध्ये नवे आणि जुनेही पेव्हर ब्लॉक आढळून आले. यात जुन्या पेव्हर ब्लॉकवरील रंगरंगोटी दिसून येत आहे. सुमारे सात लाखाच्या या कामाला स्थानिक नगरसेवक अशोक पाटील यांची संमती आहे. उपयोगात नसलेल्या पदपथाला नवीन साज चढविला जात आहे. हीच स्थिती कोपरखैरणे येथील सेक्टर-१८ मधील तीन टाकीजवळील कामाची आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास पेव्हर ब्लॉक चांगले असल्याची कबुली दिली जात आहे. ठाणे बेलापूर मार्गावर तर दोन उड्डाणपुलांच्या कामामुळे पदपथ गायब करण्यात आले असून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. तेथील पेव्हर ब्लॉक कुठे गेले, याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यावर पालिका अधिकाऱ्यांनी गुपचिळीचे धोरण अवलंबले आहे.

पेव्हर ब्लॉकचे काम एमएमआरडीए करीत आहे. त्यामुळे पालिकेची मालमत्ता नष्ट केली जात आहे. नवी मुंबई पालिकेचे पेव्हर ब्लॉकप्रेम सर्वज्ञात आहे. खासगी सोसायटय़ांतही पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामावर कॅगने याआधीही ताशेरे ओढले आहेत.  मुंबई पालिकेत अधिकारी व कंत्राटदार यांच्या साटेलोटय़ामुळे पेव्हर ब्लॉकला कायमचे अलविदा करण्यात आले असून रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. नवी मुंबई पालिकेच्या मानगुटीवर बसलेले हे पेव्हर ब्लॉकचे भूत कधी उतरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.