देशी कट्टे आणि काडतुसांची बेकायदा विक्री करण्यासाठी उत्तरप्रदेश येथून एक व्यक्ती नवी मुंबईत येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी एकास अटक केली.

अनिल चौहान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सात देशी कट्टे  आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. चौहान याच्याकडून ७७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी चौहान याच्याविरोधात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, जबर दुखापत करणे आदी गुन्हे दाखल आहेत.