News Flash

शेतघर कोसळून मुलगी ठार

पनवेल तालुक्यातील घटना; ढिगाऱ्याखालून तीन मुलांची सुखरूप सुटका

पनवेल तालुक्यातील घटना; ढिगाऱ्याखालून तीन मुलांची सुखरूप सुटका

पनवेल : पनवेलजवळील पेणधर गावातील एकमजली शेतघर मंगळवारी पहाटे कोसळले. यात ढिगाऱ्याखाली सापडून एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तीन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हिना हरिजन असे या घटनेतील मृत मुलीचे नाव आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला याची माहिती मिळल्यानंतर ते घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखालून हंसिका, अनपन आणि संतोष या तीन मुलांना सुूरक्षित बाहेर काढले.

पेणधर गावातील भूखंड क्रमांक २७ वरील शेतजमिनीवर मुन्ना हरिजन यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून राहत होते. त्यांचे राहते एकमजली घर धोकादायक झाले होते. त्यामुळे ते भाडय़ाने घर शोधत होते. मंगळवारी अचानक ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पालिका सदस्यांनी या ठिकाणी भेट दिली.

पुनर्बाधणीचा प्रश्न प्रलंबित

पालिका होण्याअगोदरपासून समाविष्ट गावांमधील घरांचा पुनर्बाधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. पालिकेच्या अनेक  सभांमध्ये जुने घर दुरुस्तीसाठी केलेले नियम शिथिल करावेत अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली आहे. त्यावर पालिकेच्या नियोजन प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. निवासी क्षेत्राप्रमाणे विद्यालयांचे बांधकाम धोकादायक ठरत आहे. यावर पालिकेने लवकर धोरण ठरवावे अशी मागणी सदस्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:47 am

Web Title: one storey farmhouse in pendhar village near panvel collapsed zws 70
Next Stories
1 ‘कोहिनूर डेव्हलपर्स’च्या तळोजातील इमारतीही धोकादायक
2 करोनामुळे १०० विद्युत बस लांबणीवर
3 खारघरमधील मोबाईल शोरूम लुटणारी टोळी ताब्यात
Just Now!
X