23 October 2020

News Flash

निर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’

सलग दोन दिवस दरवाढ; चांगल्या प्रतीचा कांदा प्रतिकिलो ४५ रुपयांवर

सलग दोन दिवस दरवाढ; चांगल्या प्रतीचा कांदा प्रतिकिलो ४५ रुपयांवर

नवी मुंबई : देशातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी केंद्र सरकारने  निर्यातबंदी लागू केल्यानंतर दोन-तीन दिवस स्थिर राहिलेले कांद्याचे भाव मुंबईच्या घाऊक बाजारात वाढतच आहेत. गेली दोन दिवस यात वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी चांगल्या प्रतीचा कांदा दर प्रतिकिलो ४५ रुपयांवर पोहचला आहे.

अवकाळी पाऊस आणि सडलेला साठवणीतील कांदा यामुळे कांद्याचा कमी पुरवठा होत असल्याने दर वाढलेले असल्याचे दिसून येत आहेत. निर्यातबंदीनंतर घाऊक बाजारात येणारा कांदा निम्म्यावर आला आहे.

दक्षिण भारतात झालेल्या मुसळधार पावसाने कांद्याचे उत्पादन मात्र घटले आहे.  देशात कांद्याचे दर तीस रुपये प्रति किलोपर्यंत मर्यादित असताना केंद्र सरकारने दिल्लीत झालेली कांद्याची भाववाढ लक्षात घेऊन बांगलादेश, श्रीलंका व आखाती देशात होणारी भारतीय कांद्याची निर्यात बंद करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी दिलेले आहेत. त्यामुळे कांद्याचे देशातील वितरण वाढून कांद्याच्या दराची घसरण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हा अंदाज आठ दिवसांनंतर मुंबईत फोल ठरला आहे.  सोमवारी तुर्भे येथील कांदा, बटाटा, लसूण किरकोळ बाजारात केवळ आठ हजार १० क्विंटल कांदा आला आहे. त्यामुळे एक हजार रुपयांनी प्रति क्विंटल घसरलेला कांदा आज पुन्हा पूर्ववत भावाने विकला गेला.

त्यामुळे कांद्याचे घाऊक बाजारातील प्रतिकिलोचे दर हे १८ ते २८ रुपये असून किरकोळ बाजारात तो ४० ते ४५ रुपये किलोने विकला गेला.  तर मंगळवारीही कांदा दरात

वाढ झाली. बाजारात एकूण ७६ गाडी कांदा आवक झाली असून एक नंबरचा कांदा प्रतिकिलो ४० ते ४५ रुपयांवर गेला. तर पाल्याचा कांदा हा १० ते १९ रुपयांना मिळत होता. निर्यात बंदी केली तरी पावसामुळे आवक कमी होत आहे. तर साठवणुकीतल कांदा खराब आहे. त्यामुळे दरवाढ यापुढेही होत राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

डाळिंबालाही पावसाचा फटका

नवी मुंबई : डाळिंब पिकालाही पावसाचा फटका बसला असून एपीएमसीतील घाऊक बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे. त्यामुळे डाळिंबाच्या दरात प्रतिकिलोला ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.

ऑगस्ट महिन्यानंतर आवक वाढत डाळिंबाचा हंगाम सुरू होतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आवक कमी होत आहे. पावसाने डाळिंबाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. सांगली, आटपाडी येथून मोठय़ा प्रमाणात आवक होत असते.  या ठिकाणी १५ ते २० हजार हेक्टरवर डाळिंब लागवड केली जाते. मात्र पावसाने येथील पिकांचे नुकसान झाले आहे.  २० ते २५ गाडय़ा होणारी आवक आता ८ ते १० गाडय़ांवर आली आहे. ५० टक्के आवक कमी झाली

आहे. त्यामुळे डाळिंबाचे दरही ३० ते ५०  रुपयांनी वाढले आहेत. घाऊक बाजारात प्रति किलो ३० ते १५० रुपयांनी मिळणारे डाळिंब आता ६० ते २०० रुपयांवर गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 1:57 am

Web Title: onion prices continue to rise in mumbai wholesale market zws 70
Next Stories
1 अतिसंक्रमित नेरुळवर ‘लक्ष’
2 खाटा संकेतस्थळावरच उपलब्ध!
3 बेकायदा कोविड रुग्णालये
Just Now!
X