26 November 2020

News Flash

कांद्याच्या दरात १० रुपयांची घसरण

इराण आणि इजिप्तहून आयात वाढल्याचा परिणाम

(संग्रहित छायाचित्र)

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी इराण आणि इजिप्तहून कांद्याची आयात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वाशी येथील एपीएमसी बाजारात गुरुवारी कांद्याच्या दरात १० रुपयांची घसरण झाली.

ऑक्टोबर महिन्यात काही जिल्ह्य़ांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. परिणामी ओला कांदा बाजारात दाखल होत असून, एकूण आवकही कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ८५ रुपये, तर किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने शंभरी गाठली. देशी कांद्याचे दर वधारल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी इराण, इजिप्तहून कांद्याची आवक वाढविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत इराणवरून १०टन आणि इजिप्त येथून १० टन कांदा एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे. परदेशी कांद्याला प्रतिकिलो ५० ते ६० रुपये, तर देशी कांद्याला ७० ते ७५रुपये बाजारभाव आहे. हे दर पुढील एक महिना कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:20 am

Web Title: onion prices fall by rs 10 abn 97
Next Stories
1 घरांच्या किमती सिडको कमी करणार?
2 रेल्वे स्थानकांबाहेर करोना चाचणी केंद्रे
3 पाच पोलिसांना करोनाचा पुन्हा संसर्ग
Just Now!
X