राज्यात उत्पादन वाढले असताना शेजारच्या राज्यांनीही कांदा लागवड वाढविल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. तुर्भे येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारात कांदा पाच ते आठ रुपये प्रती किलो झाला आहे. हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव पडल्याने ग्राहक खूश असले तरी शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. तोलाई, आडत दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात फार काही पडत नसल्याने सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. कांद्याला मिळणारा चांगला भाव बघून शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले होते.