26 September 2020

News Flash

Coronavirus : उपचार घेत असलेले रुग्ण केवळ ३३ टक्के

नवी मुंबईत ७४१७ जण करोनामुक्त

नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागातील पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन सामूहिक तपासणी करीत आहेत. मंगळवारी घणसोली गावातील रहिवाशांची तपासणी करण्यात आली. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर)

नवी मुंबईत ७४१७ जण करोनामुक्त

नवी मुंबई : नवी मुंबईत फक्त ३३ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. अर्थात शहरातील १२ हजार रुग्णांपैकी ३९५० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

काही दिवासांपासून दिवसागणिक २०० ते ३५०च्या दरम्यान रुग्ण सापडत आहे.  शहरात सापडणारम्य़ा रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नसलेले तर काही सौम्य नसलेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असलेले व  करोनामुळे मृत झालेल्यांमध्ये  ५० वयोगटावरील  रुग्ण अधिक आहेत.

शहरात करोना चाचण्यांचा अहवाल सकारात्मक आलेल्यांची संख्या १२ हजापर्यंत पोहोचली आहे. करोनामुक्तीचा दर ६४ टक्क्यांपर्यंत आहे. केवळ ३४ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.  नवी मुंबईत येत्या काळात मृत्यूदर कमी करण्यासाठी पालिका प्रभावी उपाययोजना करणार आहे.

शहरात करोनावर मात करण्यासाठी पालिका हद्दीतील प्रत्येक परिसरात प्रयत्नशील आहे. करोनामुक्तीचा दर वाढत चालला आहे. ही बाब दिलासादायक आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिका प्रभावी उपाययोजना आखणार आहे.

  -अभिजीत बांगर, पालिका आयुक्त

करोनास्थिती

७,७१८    करोनामुक्त रुग्ण

३,८९६   उपचार घेत असलेले रुग्ण

११,९६६  एकूण

३५२     मृत्यू

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:42 am

Web Title: only 33 percent of covid 19 patients taking treatment in navi mumbai zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 अनावश्यक खर्चाला कात्री
2 बाधित ७३ गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती
3 अत्यावश्यक सेवेसाठी माथाडी आक्रमक
Just Now!
X