20 January 2021

News Flash

पोलीस दलात फक्त ९ करोनारुग्ण

आतापर्यंत १७०६ जण बाधित

आतापर्यंत १७०६ जण बाधित

नवी मुंबई : नवी मुंबइ पोलीस दलात करोनाबाधितांचा आकडा एक हजार सातशेपर्यंत गेला होता तर मृतांचा आकडा २० झाला होता. मात्र आता यातील फक्त ९ जण बाधित राहिले आहेत. यातील आठ जणांवर उपचार सुरू आहेत.

करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर सर्वाधिक काळ पोलिसांना घराबाहेर राहावे लागले. त्यामुळे अनेकांच्या संपर्कात आल्याने पोलिसांमध्ये करोनाचे रुण वाढले होते. पोलीस विभागातील चालक, नाईक, शिपाईपासून ते उपायुक्तांपर्यंत करोनाचा संसर्ग पसरला होता. त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीयही बाधित झाले होते. हे प्रमाण वाढत गेल्याने नवी मुंबई पोलिसांनी एक काळजीवाहू पथक स्थापन करीत त्यांच्याद्वारे बाधित झालेल्या कर्मचारी व कुटुंबीय यांची काळजी घेतली होती. यामुळे करोनाकाळात त्यांना या पथकाची मदत होत वेळेत उपचार मिळत गेले.

आतापर्यंत एक हजार ७०६ पोलीस अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित झाले होते, यात ६२८ पोलीस कुटुंबीय होते. तर २० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत यातील फक्त ९ करोनाबाधित शिल्लक असून सात जणांवर नेरुळच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर एक जणावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत व एक जण घरीच अलगीकरणात आहे.

अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर पडत आहोत. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी आजही नियमित प्रत्येक पोलीस ठाण्याचा आढावा घेतला जात आहे. पोलीस आयुक्त स्वत: काळजीवाहू पथकाकडून दररोज आढावा घेत आहेत.

-सुरेश मेंगडे, उपायुक्त, पोलीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:02 am

Web Title: only 9 people in navi mumbai police force affected with coronavirus zws 70
Next Stories
1 गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा
2 उद्यान देखभालीचे पुन्हा तुकडे
3 नाईकांचे आणखी दोन शिलेदार राष्ट्रवादीत
Just Now!
X