पनवेल महापालिका हद्दीत मात्र एकमेव सरकारी रुग्णालय

संतोष सावंत, लोकसत्ता

Mumbai, 150 Year Old, GT Hospital, Launch, Government Medical College, 150 years of gt hospital,
दीडशे वर्षांच्या जी. टी. रुग्णालयात आता वैद्यकीय महाविद्यालय!
govandi shatabdi hospital marathi news
मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल
9 new department, cama hospital, start, benefits, patients, thane, new mumbai, raigad,
कामा रुग्णालयामध्ये सुरू होणार नऊ नवे विभाग; मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार
nagpur, medical hospital, delay, buying, linear accelerator Machine, Cancer Treatment, Suffer, Patients,
नागपुरातील कर्करुग्णांचे हाल! लिनिअर एक्सिलेटर नसल्याने…

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात गेल्या मागील दहा वर्षांत ६०० खासगी दवाखाने, तसेच २०८ रुग्णालय आणि दीडशेहून अधिक प्रयोगशाळा आणि शरीरचिकित्सा केंद्रे उभी राहिली आहेत. याउलट सरकारी पातळीवर केवळ आठ दवाखाने आणि एक उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी झटत आहे.

दवाखाना सुरू करताना त्याची स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंद आवश्यक असताना पालिकेचा आस्थापना विभाग नसल्याने शहरातील दवाखान्यांची नोंद पनवेल महानगरपालिकेच्या दफ्तरी नाही. रुग्णालयांची नोंद मागील दीड वर्षांपूर्वी करण्यात आली. पालिकेच्या मालकीचे एकही रुग्णालय नाही, हा त्यातील ठळक मुद्दा. कामोठे येथे धर्मादाय तत्त्वावर चालणारे एमजीएम आणि खारघर येथील येरळा (आयुर्वेद) रुग्णालय आहे. खारघर येथील टाटा मेमोरियल ट्रस्टचे रुग्णालय आणि संशोधन केंद्र आहे. या तीनही रुग्णालयांचा लाभ पनवेलमधील रुग्णांना होतो. खारघरमध्ये दीडशेहून अधिक दवाखाने, कामोठे येथे ९० हून अधिक तर कळंबोलीतही ९० हून अधिक दवाखाने सुरू आहेत.

खांदेश्वर, नवीन पनवेल आणि पनवेल शहरातील दवाखान्यांची संख्या ३०० आहे. मागील दहा वर्षांत सुमारे ६०० दवाखान्यांची भर पडली. दीड वर्षांपूर्वी पालिकेने शरीरचिकित्सा केंद्रे (सोनोग्राफी सेंटर)आणि रुग्णालयांची नोंदणी सुरू केल्यावर अनेक खासगी डॉक्टर आणि वैद्यकीय तंत्रज्ञांमध्ये पालिकेच्या परवाना राजच्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू होती. अद्याप राज्यात ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट-२०१८ लागू झालेला नाही. या कायद्यानंतर दवाखान्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी बंधनकारक आहे. प्राथमिक नोंदणी पालिकेला अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर दहा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.

अनेक दवाखान्यांमध्ये प्रशिक्षित परिचारिका (नर्स), परिचर (वार्डबॉय) नसल्याने दवाखान्यांची नोंदणी करताना डॉक्टर टाळाटाळ करतात. नोंदणीनंतर या प्रशिक्षित आरोग्यसेवकांची भरती दवाखान्यांमध्ये होईल. मात्र त्याचा भुर्दंड सामान्य रुग्णांच्या खिशाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.  दवाखान्यांप्रमाणे रक्त तपासणी प्रयोगशाळा यांची नोंद पालिकेकडे नसल्याने पॅथोलॉजी तंत्रज्ञाचे शिक्षण घेऊन अनेकांनी प्रयोगशाळा पनवेलमध्ये सुरू केली आहे. यावर पालिकेचा अंकुश नाही. पालिकेने मागील वर्षी वृत्तपत्रात जाहिरात देऊन या प्रयोगशाळांना नोंदणी करण्याचे आवाहन केले, मात्र हा प्रयत्न फोल ठरला.

करोना संसर्ग साथरोगाच्या वेळी पालिकेला सुमारे पनवेलमधील खासगी ५०० डॉक्टरांच्या सेवेची मदत उभी करता आली नाही. पनवेलमधील डॉक्टरांच्या दोन भिन्न प्रतिमेमुळे पनवेलमधील सरकारी वैद्यकीय आरोग्य यंत्रणा भक्कम करण्याची गरज येथील प्रशासनाप्रमाणे लोकप्रतिनिधींची आहे. अनेक लोकप्रतिनिधी हे स्वत:चे राजकीय वर्चस्व, राजकारणाची गादी टिकविण्यात मग्न असल्याने पनवेलच्या राजकारणात आरोग्य हा करोनापूर्व काळात कधीच निवडणुकीचा मुद्दा बनू शकला नाही. सरकारी आरोग्य यंत्रणा भक्कम व्हावी, बालक व गर्भवती मातांचे लसीकरण, गर्भवती माता पोषक आहार, अंगणवाडी मुलांना पोषक आहार, रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र यासाठी पनवेलमध्ये कधीही कोणत्याही राजकीय पक्षाने आंदोलन केलेले नाही.

खासगी आरोग्य

कामोठे वसाहत

* ९० दवाखाने

* ३५ रुग्णालये

* २० प्रयोगशाळा, सोनोग्राफी व एक्सरे सेंटर

खारघर वसाहत

* ३० रुग्णालय

* १५० दवाखाने

* ३० प्रयोगशाळा,  सोनोग्राफी व एक्सरे सेंटर

कळंबोली वसाहत

* ९० दवाखाने

* १२ रुग्णालये

* ६ प्रयोगशाळा,  सोनोग्राफी व एक्सरे सेंटर