जेसीबी, कार, ट्रकचा समावेश; कोपरखैरणे, ऐरोली आगारात बस गाडय़ांसाठीच जागेची शोधाशोध

कोपरखैरणे येथील एनएमएमटीचे बसआगार सध्या खासगी आणि प्रशासनाच्या गाडय़ांचे वाहनतळ बनले आहे. जिथे केवळ बसला प्रवेश देणे आवश्यक आहे, तिथे अन्य वाहनेही विनापरवानगी पार्क केली जात आहेत.

Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
pune c dac marathi news, c dac campus placements marathi news
सीडॅकच्या ‘प्लेसमेंट्स’ना फटका; दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांमध्ये घट
fruit sale cess evaders
फळे विक्री उपकर बुडवणाऱ्यांवर कारवाई, एपीएमसी प्रशासनाचा निर्णय; प्रामुख्याने आंब्याच्या जातीचा उल्लेख करणे अनिवार्य

कोपरखैरणे बस आगारात रोजच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाडय़ा पार्क केल्या जात आहेत. यामध्ये जेसीबी, कार आणि ट्रकचा समावेश आहे. ट्रक चालकाला विचारले असता, आम्ही रोज इथेच अतिक्रमणाच्या गाडय़ा उभ्या करतो व ऐरोली बस आगारातही ही वाहने उभी केली जातात असे सांगण्यात आले. खासगी वाहने रिक्षा, दुचाकी, कारदेखील येथे पार्क केल्या जातात. एनएमएमटी प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्यामुळे बस कुठे पार्क करायच्या, असा प्रश्नचालकांना पडत आहे.

शहरातील अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग होत आहे, मात्र वेळोवेळी आम्ही अशा वाहनचालकांवर कारवाई करतो. बसस्थानकातील पार्किंगबाबत आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही तेथेही कारवाई करू.

– सचिन कोंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक, कोपरखैरणे

आम्ही ठेकेदाराकडून अतिक्रमणावरील कारवाईसाठीची साधन-सामग्री मागवितो. साईदीप कन्स्ट्रक्शनच्या प्रभू चव्हाण या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. हा ठेकेदार ऐरोली, दिघा आणि कोपरखैरणेच्या अतिक्रमण विभागाचेही काम पाहतो. या वाहनांची जबाबदारी ठेकेदारांवर आहे. तसेच आम्ही तिथे फक्त काही कालावधीसाठी वाहने पार्क करतो. मात्र त्या वाहनांसाठी काही पार्किंग व्यवस्था आहे की नाही, हे त्या ठेकेदारालाच माहिती आहे.

–  अशोक मढवी, सहआयुक्त, प्रभाग ‘ई’

बाहेरील वाहने नेहमीच पार्क केली जातात. याविरुद्ध आवाज उठविला तर वाहनचालकांकडून दमदाटी केली जाते. याबाबत लेखी प्रस्ताव अद्याप दिलेला नाही. मात्र परिवहनचे अधिकारी येथे येत असतात तेही याकडे लक्ष देत नाहीत. आम्ही याबाबत कारवाईची मागणी करणार आहोत.

– चिंतामणी कदम, बस स्थानकप्रमुख, कोपरखैरणे