29 March 2020

News Flash

किल्ले गावठाण चौकातील कोंडी फुटणार

आम्रमार्गावर जेएनपीटीकडे जाणारी हजारो कंटेनर या मार्गावरुन जातात.

पालिका मुख्यालयासमोरील तीनपदरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरून उरणफाटा येथून आम्रमार्गावरून उरण जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर पालिका मुख्यालयासमोरील वाहतूक कोंडीतून आता वाहनचालकांची सुटका होणार आहे. येथील जेएनपीटीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून तो गुरुवारी सकाळपासून खुला करण्यात आला आहे.

आम्रमार्गावर जेएनपीटीकडे जाणारी हजारो कंटेनर या मार्गावरुन जातात. त्यामुळे नेरुळ उरण फाटा ते पालिका मुख्यालयापर्यंत सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यात आता आम्रमार्ग दुरुस्तीसाठी खोदून ठेवल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. पामबीच मार्गावरून, बेलापूरकडून तसेच जेएनपीटीकडून जाणारी वाहने किल्ले गावठाण चौकात एकत्र येत होती. त्यामुळे हा चौक वाहनांनी नेहमी जाम होत होता. पालिका मुख्यालयात येणारी कर्माचारी तसेच नागरिकांनाही चौकातून मुख्यालयात येताना त्रास होत होता. येथील सिग्नलच्या चारही रस्त्यांवर सातत्याने वाहनांच्या मोठय़ा रांगा पाहायला मिळत असत. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुल होणे गरजेचे होते.

या पुलाचे काम पूर्णत्वास गेले असून गुरुवारी सकाळी उरणकडे जाणारी मागिका सुरू करण्यात आली असून सकाळी ११ वाजलेपासून आम्रमार्गावरून पुढे उरण जेएनपीटीकडे जाणारी जड व अवजड वाहने थेट उड्डाणपुलावरून उरणकडे जात आहेत. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होताना दिसली नाही. या तिन्ही मार्गिका सुरू झाल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईल अशी शक्यता आहे. तसेच पुढील काळात पालिका मुख्यालयाकडील उड्डाणपुलाचे काम झाल्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. उड्डाणपूल सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. नाहीतर सातत्याने या मार्गावर जड वाहनांची गर्दी पाहायला मिळत होती. आज यातून सुटका झाल्याची भावना वाहनचालक गणेश खापरे यांनी व्यक्त केली.

आणखी एक पूल

पालिका मुख्यालयाच्या दिशेला जोडूनच आणखी एक उड्डाणपूल होणार आहे. या पुलाचे कामासाठी २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुलासाठी ५८ कोटी खर्च करण्यात येत आहेत. हे काम झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

पालिका मुख्यालयासमोर उड्डाणपुलाचे काम सुरू असून आता एका बाजूचे काम झाल्याने उड्डाणपुलावरील मार्गिका सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेरुळ फाटय़ाकडून येणारी जड वाहने उड्डाणपुलावरून थेट उरण जेएनपीटीच्या दिशेने जात आहेत. उर्वरित उड्डाणपुलाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

– सत्यप्रकाश गांधी, अभियंता, मे.जयकुमार कन्स्ट्रक्शन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 12:03 am

Web Title: palika main gate headquarters threefold flyer open for transportation akp 94
Next Stories
1 दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद
2 पोलिसांची करोनाशी झुंज
3 निवडणूक स्थगिती उमेदवारांच्या पथ्यावर
Just Now!
X