News Flash

गावे अंधारातच!

तौक्ते चक्रीवादळामुळे वीज पुरवठा यंत्रणा कोलमडून पडली होती.

पनवेल, उरणला फटका; नवी मुंबईत वीज पुरवठा सुरळीत

नवी मुंबई/ पनवेल/ उरण : ‘तौक्ते’ चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे नवी मुंबई ,पनवेल व उरणमधील  वीजयंत्रणा खंडित झाली होती. नवी मुंबईतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र पनवेल ग्रामीण व उरणमधील गावे ४८ तासानंतरही अंधारातच आहेत.

तौक्ते चक्रीवादळामुळे वीज पुरवठा यंत्रणा कोलमडून पडली होती. नवी मुंबईत ३७ वीजेचे खांब पडल्याने काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणने युद्धपातळीवर काम करीत अनेक ठिकाणचा वीज पुरवठा सुरू केला. वादळामुळे महावितरणच्या वाशी कार्यकारी अभियंता क्षेत्रात ३७ विजेचे खांब कोसळले होते. त्यामुळे सोमवारी शहरात विजेचा लपंडाव सुरू होता. परंतु संध्याकाळपर्यंत नवी मुंबईतील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. करंजा परिसरात अद्यापही महावितरणचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे वाशी परिमंडळाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम माने यांनी सांगितले.

घणसोली व ऐरोली येथील वीजपुरवठा २८ तासांनंतर सुरळीत झाला. मंगळवारी दुपारी तीन वाजल्यानंतर या परिसरात वीज आली.   घणसोली गाव, सिम्प्लेक्स कॉलनीसह पामबीच परिसर, गोठीवली गाव, तडवली गाव, रबाळे, एमआयडीसीतील अदिवली-भुतवळी, पावणे, समतानगर व अन्य आदिवासी पाडय़ांवर वीजपुरवठा सोमवारी सकाळी दहा ते बाराच्या सुमारास खंडित झाला होता. त्यामळे इमारतीतील उद्वाहन, पाण्याच्या मोटारी, बंद असाल्याने मनस्ताप सहन करावा लागाला. घणसोली येथे दोन ठिकाणी वीज तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, तर एमआयडीसीमध्ये रोहित्र जळाल्याने गोठीवली तडवली गाव, रबाळे, अदिवली, भुतवळी, पावणे गाव, समतानगर व अन्य आदिवासी पाडय़ांवर वीजपुरवठा खंडित झाला होता.

पनवेलमधील ९५ गावांत वीज नाही

ग्रामीण भागात वादळामुळे सोमवारी १६० विजेचे खांब जमीनदोस्त झाले. महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू असून ग्रामीण भागातील वीजपुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. महावितरणने कर्मचाऱ्यांची पथके नेमून वीज व्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न मंगळवारी दिवसभर सुरू होते. तालुक्यातील ९५ गावांमध्ये अद्याप वीजपुरवठा सुरू झालेला नाही. मंगळवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती वीज महावितरण कंपनीने दिली.

घणसोली व परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी संततधार पावसाने अडथळे येत असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात थोडा उशीर झाला. दुपारी अडीच वाजेपर्यंत म्हात्रे आणि कौल आळीव्यतिरिक्त वीजपुरवठा सुरळीत झाला तर संध्याकाळी या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला.

– ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, वीज वितरण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:05 am

Web Title: panvel hit uran power supply in navi mumbai is smooth ssh 93
Next Stories
1 ग्राहकांअभावी भाजीपाला पडून
2 करोनामुक्तीचा दर पुन्हा ९६ टक्के
3 एक वेळी एक हजार नागरिकांच्या लसीकरणाची क्षमता
Just Now!
X