20 January 2021

News Flash

पनवेल, खारघरची पाणी समस्या सुटणार

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला ११९ कोटी ८० लाख रुपये अदा

(संग्रहित छायाचित्र)

उन्हाळ्याच्या सुरुवातीस खारघर, कळंबोली, पनवेल या दक्षिण नवी मुंबईत सुरू होणारी पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सिडकोने पावले उचलली असून पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून १२० दशलक्ष लिटर पाण्याचा जादा उपसा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला ११९ कोटी ८० लाख रुपये अदा करण्यात आलेले आहेत.

याशिवाय हेटवणे धरणातून जलवाहिन्यांद्वारे येणाऱ्या पाण्याला सरळता यावी यासाठी हमरापूर येथे जलवाहिन्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या ७०० मीटर लांबीच्या बोगद्याचे काम फेब्रुवारीमध्ये पूर्ण करण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे.

खारघर, कळंबोली, पनवेल, तळोजा, कामोठे या भागांत पाण्याची समस्या भेडसावू आहे. हेटवणे धरणातून सिडको दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी उचलत असून ते कमी दाब आणि अल्प पुरवठा होत असल्याने खारघरमधील नागरिकांना या पाणी समस्येचा सामना करावा लागत असल्याने नाराजी वाढलेली आहे. हेटवणे धरणातील तांत्रिक यंत्रणादेखील जुनी झाल्याने पाण्याचा कमी पुरवठा होत होता. सिडकोने या बाजू सुधरवताना भविष्यात लागणाऱ्या जादाच्या पाणीपुरवठय़ासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला जवळपास १२० कोटी रुपये अदा केलेले आहेत. यामुळे सिडकोला या धरणातून जास्त पाणी मिळणार असून २०२५ पर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल अशी तजवीज केली आहे. नवी मुंबई विमानतळ, नैना क्षेत्र यामुळे या भागाची लोकसंख्या वीस लाखांच्या घरात जाणार आहे. सिडकोने सध्या पाणीपुरवठय़ावर तात्काळ उपाय म्हणून हमरापूर भागातील टेकडय़ा पार करून येणाऱ्या जलवाहिनीला ७०० मीटर बोगदा खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले असून हे पुढील महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे सिडको क्षेत्राला तीस दशलक्ष लिटर पाणी मिळणार असल्याने खारघर व उलवे या भागातील पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

दक्षिण नवी मुंबईतील पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिडकोने एका तज्ज्ञ संस्थेची नेमणूक केली असून ही संस्था भविष्यात लागणारे पाणी, त्याचे स्रोत यांचा अभ्यास करणार आहे.

– डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:10 am

Web Title: panvel kharghar water problem will be solved abn 97
Next Stories
1 नाईकांच्या मदतीला ‘शेलारमामा’
2 प्रत्येक घरात नळ; मात्र पंधरा दिवसांनी पाणी
3 मेट्रो पुढील वर्षांअखेर धावणार
Just Now!
X