23 November 2020

News Flash

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांची झाडाझडती

ग्णालयाच्या प्रवेशव्दारावर वैद्यकीय शुल्काचे दरफलक लावले नाही.

पनवेल : दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या विशेष पथकाने पनवेलमधील विविध खासगी रुग्णालयांची झाडाझडती केल्यानंतरही पनवेलमध्ये मोठय़ाप्रमाणात चढय़ा दराने वैद्य्कीय शुल्क वसूल करण्याचे काम काही खासगी रुग्णालयांनी सुरू ठेवल्याने पनवेल पालिकेने तब्बल २५ रुग्णालयांची देयके तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये खारघर येथील निरामय रुग्णालयाला पालिकेने तीन कंत्राटदारांचे दोन लाख रुपये परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विविध रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने आरोग्य विभागाने घालून दिलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांनासुद्धा कारणे दाखवा नोटिसा देण्याचे काम पालिकेत युद्धपातळीवर सुरू आहे.

रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर वैद्यकीय शुल्काचे दरफलक लावले नाही. सरकारने आखून दिलेल्या दराच्या तिप्पट वैद्यकीय शुल्क आकारणे अशा तीन तक्रारी पनवेल पालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी १० दिवसांपूर्वीच राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड संसर्गावर नियंत्रणासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकातील सदस्य आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघर, कळंबोली येथील रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांकडून मिळविलेल्या वैद्यकीय शुल्क तपासणीची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत खारघर येथील पोलॅरिस रुग्णालयाने ११० देयकांमधील अवाजवी देयक आकारणी समोर आली होती. त्यानंतर पनवेलच्या रुग्णालयांनी कोविड रुग्णांकडून सरकारने आखून देलेल्या दरपत्रकाव्यतिरिक्त अतिरिक्त  वैद्यकीय शुल्क आकारू नये अशा संदेश इतर रुग्णालयांना दिला होता.

पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी वेळोवेळी रुग्णालय व्यवस्थापकांना अवाजवी शुल्काची आकारणी करु नये अशी तंबी दिली होती. तरी खारघर येथील निरामय रुग्णालयाने तीन रुग्णांकडून ८६ हजार, ५५ हजार आणि ६० हजार अशी देयके वसूल केल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या देयकांची तपासणी केल्यावर अतिरिक्त रक्कम रुग्णालयाने घेतल्याचे उजेडात आल्यावर निरामय रुग्णालयाला पालिकेने त्या तीनही रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेली रक्कम परत करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 1:31 am

Web Title: panvel municipal corporation to check the bill payments of 25 hospitals zws 70
Next Stories
1 ‘शीव-पनवेल’ची धूळधाण अटळ?
2 टाळेबंदीने संधीचे दरवाजे उघडले
3 मरणानेही सुटका केली नाही..
Just Now!
X