23 March 2019

News Flash

पनवेल जलमय होणार नाही!

यंदाच्या पावसाळ्यातही पनवेल शहर व ग्रामीण हद्दीतील भाग जलमय होणार नाही असा दावा पनवेल महापालिका व तहसील कार्यालयाने केला आहे .

पनवेल महापालिका

पालिका, तहसीलदार कार्यालयाचा दावा

पनवेल शहर व ग्रामीण भागात कुठल्याही प्रकरची दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून  आपत्कालीन  व्यवस्था सज्ज केलेली आहे. नालेसफाई केली आहे. झाडांची छाटणी झाली आहे. अनधिकृत व मोडकळीस आलेल्या इमारतींतील रहिवाशांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही पनवेल शहर व ग्रामीण हद्दीतील भाग जलमय होणार नाही असा दावा पनवेल महापालिका व तहसील कार्यालयाने केला आहे .

पनवेल शहर परिसरातील चिंतामणी  हॉल, बावन बंगला, दत्त मंदिर या सहित आणखी पाच ते सहा ठिकाणी सखल भागांत पाणी तुंबते, त्यामुळे नालेसफाई कर्मचारीवर्ग या विभागात फिरतच असणार आहेत. पूरपरिस्थिती किंवा कोणतेही संकट आले तर त्याचा सामना करण्यासाठी कृतीगट स्थापन केले आहेत. सिडकोचे अग्निशामक दल सज्ज केले जाणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्र पालिकेची तयारी

 • सखल ठिकाणी नालेसफाई कर्मचारी पाणी साचल्याचे निदर्शनास येताच त्याचा निचरा करतील.
 • पनवेल पालिकेमार्फत कृतीगट स्थापन करण्यात आले आहेत. झाडे पडणे, जुन्या इमारती पडणे यांसारख्या घटना घडल्यास पालिकेसह सिडकोचे अग्निशामन दल सज्ज राहणार आहे.
 • नियंत्रण कक्षात पालिका कर्मचाऱ्यांच्या कामांची यादी संपर्क क्रमांकांसह ठेवण्यात आली आहे.
 • पनवेल तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे

शिलोत्तर रायचूर, पालीदेवद, आसूडगाव, विचुंबे, चिपळे, केवाळे, हरीग्राम काळुंद्रे (भिंगारी), देवद, उसर्लीखुर्द, कामोठे (नौपाडा), कोळीवाडा, पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, बावन बंगला, साईनगर, मिडल क्लास सोसायटी, वडघर, करंजाडे, वाधिवली, कोळखे, पळस्पे, शिरवली, चिंध्रण, धोदानी, मोहोदर, पडघे, नावाडे, रोडपाली, घोटगाव, तळोजा मजकूर, तळोजा पाचनंद, कळंबोली वसाहत, वावेघर, गुळसुंदे, तुराडे, आपटे, कालीवली, कराडेखुर्द, कासाप, सवणे.

दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे

चिखले, आकुर्ली, हरीग्राम, वडघर, करंजाडे, ओवळे, कोळखे, पळस्पे, महोदर, धोदाणी, खैरवाडी, कोंडले, खानाव, वाजे, चेरीवली, करंबेरी, वारदोली, लाडीवली, कालीवली, सवणे, सारसई, चाळ, पाले बुद्रुक, जांभिवली (बामणोली), सवणे, उसरण, गाढेश्वर (देहरंग), जांभिवली, देवळोली, सावळे.

टोल फ्री क्रमांक

 • महानगरपालिका १८००२२७७०१
 • तहसीलदार कार्यालय ०२२२७४५२३९९

उरण नगरपरिषद, ग्रामपंचायती नगरपरिषदेची तयारी

 • नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींकडून नालेसफाई केली जात आहे.
 • यात शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच सामाजिक संस्था व सहकार्य करणाऱ्या नागरिकांची मदत घेतली जाणार आहे.
 • सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयांत आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्याची तजवीज करण्यात आली आहे. यामध्ये तहसील, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायती अशा चार उपविभागांत कामाचे वाटप करण्यात आले आहे.
 • पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत.

पाणी साचणारी ठिकाणे

 • गणपती चौक, स्वामी विवेकानंद चौक, बालई मार्ग तसेच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय ते पेन्शर्स पार्क, चिरनेर, मोठी जुई, कडापे, कळंबुसरे

टोल फ्री क्रमांक

 • आपत्ती व्यवस्थापन कक्ष ०२२-२७२२२३५२

First Published on June 8, 2018 1:07 am

Web Title: panvel municipal corporation water logging