02 June 2020

News Flash

रस्ता काँक्रीटीकरणाच्या अर्धवट कामामुळे नगरसेविकेचा बळी

या अपघातात मुग्धा यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नगरसेविका मुग्धा लोंढे

पनवेल : रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या अर्धवट कामामुळे एका नगरसेविकेचा बळी गेल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील प्राचीन रुग्णालयासमोर घडली. मुग्धा लोंढे असे या नगरसेविकेचे नाव आहे. पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ ब मधील त्या नगरसेविका होत्या.

मुग्धा लोंढे आणि भाजप महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत या प्राचीन रुग्णालयाशेजारील स्टेट्स हॉटेलसमोर उभ्या होत्या. त्यावेळी बाजूच्या अर्धवट काँक्रीटीकरण झालेल्या अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारचे चाक रस्त्याकडेला घसरले. कार पुन्हा काँक्रीटच्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न कारचालक महिलेने करताच कार भरधाव वेगाने लोंढे आणि राऊत यांना धडकली. या अपघातामुळे काही क्षणांत या दोघी रस्त्याच्या एका बाजूला फरफटत गेल्या.

या अपघातात मुग्धा यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. राऊत यांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 4:29 am

Web Title: panvel woman corporator killed in road accident zws 70
Next Stories
1 नाईकांविरोधात ऐरोलीत नाहटा अपक्ष?
2 नवी मुंबईत कॉंग्रेसलाही खिंडार
3 आरोग्य सेवेची वानवा
Just Now!
X