07 April 2020

News Flash

शुल्कवाढीवरून पनवेलमध्ये पालकांचा मुख्याध्यापिकेला घेराव

शुल्कवाढ अन्यायकारक पद्धतीने करण्यात आली नसल्याचा दावा मुख्याध्यापिका सईदा यांनी केला आहे.

नवीन पनवेल वसाहतीतील सेंट जोसेफ विद्यालयाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात ४०० पालकांनी मुख्याध्यापिकांना घेराव घातला.

शुल्कवाढीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकांसोबत बैठक घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचे प्रगतिपुस्तक घेण्यासाठी शनिवारी शाळेत बोलावण्यात आले होते. त्यावेळी अचानक शुल्कवाढ केल्याची माहिती मिळताच पालक संतप्त झाले. त्यांनी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. पालकांच्या या आंदोलनात काही स्थानिक राजकीय पुढारीही सामील झाले होते. पालकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने काही वेळाने पोलिसांना पाचारण करण्यात आले.दरम्यान, शुल्कवाढ अन्यायकारक पद्धतीने करण्यात आली नसल्याचा दावा मुख्याध्यापिका सईदा यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 3:43 am

Web Title: parents anger on principal
टॅग Parents,Principal
Next Stories
1 ‘जेएनपीटी’ कंत्राटी कामगारांचा मोर्चा
2 उरणमधील शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा उतारा
3 बनावट नंबरप्लेट बाळगणाऱ्या चालकाला अटक
Just Now!
X