News Flash

नवी मुंबईत ९ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

आठ दिवसांपूर्वी शाळेत का जात नाही, शाळेत अभ्यास का करत नाही ?, या कारणावरुन त्याला आई-वडील ओरडले होते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी मुंबईत नऊ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ दिवसांपूर्वी शाळेत का जात नाही, या कारणावरुन त्याला आई- वडील ओरडले होते आणि या रागातून तो घर सोडून निघून गेला होता.

कौपरखैरणे येथे ९ वर्षांचा मुलगा आईवडिलांसोबत राहतो. आठ दिवसांपूर्वी शाळेत का जात नाही, शाळेत अभ्यास का करत नाही ?, या कारणावरुन त्याला आई-वडील ओरडले होते. यामुळे मुलगा रागावला होता आणि तो घरातून निघून गेला. सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास परिसरातील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. मुलाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतरच नेमके कारण उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वी १४ वर्षांच्या मुलीनेही स्मार्टफोन न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन आत्महत्या केली होती. ही घटनाही कोपरखैरणे परिसरात घडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 12:28 pm

Web Title: parents scolded over studies 9 year old commits suicide in kopar khairane
Next Stories
1 ..अन् सिडकोच्या सामानाची जप्ती टळली
2 एपीएमसीची उलाढाल उतरणीला
3 सागरी सुरक्षा अधिक भक्कम
Just Now!
X