07 March 2021

News Flash

नैना क्षेत्रातील छोटय़ा घरांसाठी पार्किंग सवलत

राज्य सरकारने वसई ते अलिबाग या एमएमआरडीए क्षेत्रात एकच विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे.

सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) बांधण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरे संकुल योजनेत पार्किंग सवलत देण्याचा सिडको प्रस्ताव आहे. तो शासन मंजुरीसाठी लवकरच पाठविला जाणार आहे. मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणांच्या (एमएमआरडीए) विकास नियंत्रण नियमावलीत सर्व घरांना पार्किंग सक्तीचे करण्यात आले होते; मात्र छोटय़ा घरांना कार पार्किंगची आवश्यकता नसल्याचे सिडकोने सुचवले आहे. महामुंबई परिसरात सुमारे २० हजार घरे शासनाच्या परवडणाऱ्या घरे योजनेंतर्गत भविष्यात तयार होत आहेत. त्यातील काही प्रकल्प या अटीमुळे रखडले आहेत. त्याचा मार्ग सुकर करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे.

राज्य सरकारने वसई ते अलिबाग या एमएमआरडीए क्षेत्रात एकच विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. चार वाढीव चटई निर्देशांक निश्चित केला आहे. त्यामुळे येत्या काळात महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गृहनिर्मिती होणार आहे. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही विकासकांना त्यांच्या खासगी जमिनींवर गृहप्रकल्प उभारण्यासाठी चार एफएसआय दिला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर घरे बांधणाऱ्या विकासकांची संख्या पनवेल तालुक्यात वाढली. त्यातील सरकारला देण्यात येणाऱ्या घरांसाठी पार्किंग सक्तीचे करण्याची आवश्यकता नसल्याचे सिडको प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे.  ३०० ते  ४०० चौरस फूट घरात राहणाऱ्या रहिवाशांना चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सक्तीचे केल्यास विकासकांना परवडणारी घरेच परवडणार नाहीत. त्यामुळे खासगी आणि मोठय़ा घरांसाठी चारचाकी पार्किंग सक्तीचे ठेवण्यात आलेली अट योग्य असून परवडणाऱ्या घरांसाठी ही अट शिथिल करण्यात येणार आहे. छोटय़ा घरांना दुचाकी वाहनांसाठी पार्किंग मुबलक ठेवले जाणार आहे. नैना क्षेत्रात येत्या काळात पाच लाख घरांची निर्मिती होणार असून त्यात परवडणाऱ्या घरांचा मोठा भरणा असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 12:49 am

Web Title: parking facilities to naina project resident
Next Stories
1 ‘स्वप्नपूर्ती’च्या लाभार्थीना मुदतवाढ
2 उरणमध्ये फिरत्या मनोऱ्यांचा थरार
3 कर्णकर्कश उन्माद!
Just Now!
X