01 October 2020

News Flash

प्रवाशांचा पाय खोलात

रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर समोरच हे बस स्थानक असल्याने लोकल प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरते. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी असते.

वाशी बसस्थानकात मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना कसरत करावी लागत आहे.

वाशी स्थानकात डबक्यात पाय बुडवल्याशिवाय बसमध्ये चढणे कठीण

वाशी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या एनएमएमटी बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. बसचालक आणि प्रवाशांना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागत आहे. एनएमएमटीने ही समस्या सिडकोच्या निदर्शनास आणली असूनही सिडकोने अद्याप उपाययोजना केलेली नाही.

नवी मुंबई हे सिडकोने वसवलेले शहर मनापालिकेकडे हस्तांतरित केले असले तरी शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत, की ज्यांचा ताबा सिडकोने अद्याप सोडलेला नाही. ठिकाणाचा ताबा सोडण्यास तयार नसलेल्या सिडकोला त्या जागांच्या देखभालीत मात्र अजिबात स्वारस्य नाही. वाशी येथील एनएमएमटी बस स्थानक, हे अशा ठिकाणांपैकीच एक आहे. रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर समोरच हे बस स्थानक असल्याने लोकल प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरते. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी असते.

सध्या या बस स्थानकात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. बस थांब्यांसमोरील ज्या जागेतून प्रवासी बसमध्ये चढतात तिथेच डबकी साचल्याने प्रवाशांना पाण्यात पाय ठेवूनच बसमध्ये चढावे लागत आहे. खड्डे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पडले आहेत की, बसचालकांनी थोडी दूर बस उभी केली तरीही प्रवाशांना खड्डय़ातच उतरावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि बालकांना कडेवर घेऊन प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ  शकला नाही. बस स्थानक असल्याने या ठिकाणी एमएमएमटीचे कार्यालयसुद्धा आहे. तिथे प्रामुख्याने बसच्या फेऱ्यांची नोंद केली जाते. तिथे रोज किमान ५० ते ६० तक्रारी येतात. याबाबत एमएमएमटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सिडकोला कळवण्यात आल्याचेही कळते.

खड्डय़ांबाबत रोज अनेक तक्रारी येत आहेत, मात्र वाशी रेल्वे स्थानकाची जागा आमच्या अखत्यारीत येत नाही. तिथे सिडकोचे अधिकार असून याबाबत सिडकोच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे.

– शिरीष आरदवाड, एनएमएमटी व्यवस्थापक

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 2:51 am

Web Title: pass passengers feet in vashi station
Next Stories
1 पर्यावरणस्नेही संकुल
2 पहिल्याच दिवशी दोन हजार अर्ज
3 इमारतीचे प्लास्टर कोसळून दोन जखमी
Just Now!
X