बावखळेश्वर कारवाईनंतरचा पोलीस बंदोबस्त दुसऱ्या दिवशीही कायम

नवी मुंबई एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर नवी मुंबई शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मंदिरावर कारवाई होत असताना मंगळवारी दुपारपासून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर प्रकल्पग्रस्त विरुद्ध शिवसेना असा वाद रंगवण्याचा प्रयत्नही होत होता. मात्र, पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्यामुळे बुधवारी समाजमाध्यमांवरही शुकशुकाट होता.

youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

दरम्यान, मंदिरावरील कारवाईला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप करीत या पक्षाबद्दल अपशब्द काढणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात सेना पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे.

बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईमागे राजकीय कट असल्याचा आरोप करीत मंदिर बचाव समिती व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर हल्लाबोल सुरू केला होता. मंगळवारी प्रत्यक्ष कारवाईला सुरू होताच समाजमाध्यमांवरून टीकेची मोहीम अधिक प्रखर करण्यात आली. या कारवाईला राजकीय रंग देतानाच प्रकल्पग्रस्त विरुद्ध अन्य असे वळणही देण्याचा प्रयत्न होताना दिसून आला. मात्र, बुधवारी अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होताना दिसले नाहीत. मंदिरावर कारवाई करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसा किंवा वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचना यांमुळे राष्ट्रवादी समर्थकांनी तलवार म्यान केली असावी, असा अंदाज नवी मुंबई पोलिसांच्या सायबर कक्षातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.

दरम्यान, बावखळेश्वर कारवाईसंदर्भात फेसबुकवरून प्रसारित करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये शिवसेनेबाबत अपशब्द वापरण्यात आल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय घारपुरे या व्यक्तीने सेनेवर हीन दर्जाची टीका केल्याची तक्रार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी याला दुजोरा दिला असून या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाइनंतर त्याचे पडसाद गावांत दिसून येतील, या शक्यतेने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती. हा बंदोबस्त बुधवारीही कायम होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या बोनकोडेतही मोठा बंदोबस्त आहे. ‘तणाव निवळला असला तरी खबरदारचा उपाय म्हणून  बंदोबस्त ठेवला आहे. रात्रीच्या वेळी गस्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे,’ असे पाठारे यांनी सांगितले.

भाजपबद्दल मवाळ भूमिका?

बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईनंतर टीकेचा सर्व रोख शिवसेनेच्या नेत्यांकडे असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात मुख्यमंत्र्यांनी सौम्य भूमिका घेतली असताना शिवसेनेचे नेते असलेल्या मंत्र्यांनी कारवाईच्या बाजूने मत मांडले, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत. मात्र, सरकारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपबाबत मवाळ भूमिका घेण्यात आल्याचे दिसून येते. यावरून राजकीय चर्चेला ऊत आला आहे.