21 January 2021

News Flash

घाऊक बाजारात वाटाणा गडगडला

दर ८० वरून २५रुपयांवर; आवक वाढल्याने भाज्यांचे दरात घट

एपीएमसीतील भाजी बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. ८० रुपयांवर गेलेल्या वाटाण्याचे दर २५ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत.

लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : एपीएमसीतील भाजी बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. ८० रुपयांवर गेलेल्या वाटाण्याचे दर २५ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. तर फ्लावर, कोबी, काकडी, वांगी, शिमला मिरचीचे दरही दहा रुपयांनी कमी झाले आहेत.

पावसामुळे नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले होते. आता परराज्यातील भाज्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी बाजारात एकूण ५५६ गाडय़ा दाखल झाल्या आहेत. परराज्यांतील वाटाणा मोठय़ाप्रमाणत आला आहे. मध्यप्रदेश येथून हिरवा वाटाणा २ हजार ८४८ क्विंटल दाखल झाला आहे. त्यामुळे ७० तर ८० रुपये प्रतिकिलो दर असलेला वाटाणा गुरुवारी २४ ते २६ रुपये प्रतिकिलोवर आला आहे.  याबरोबरच कोबी, फ्लावर, दुधी, शिमला मिरची, काकडी, वांगी यांचीही आवक वाढल्याने दर कमी झाले आहे. घाऊक बाजारात या भाज्या २० ते ३० रुपये प्रतिकिलो होत्या. त्यात दहा रुपये प्रतिकिलोचे दर कमी झाले आहेत. पालेभाज्यांचे दर स्थिर असून प्रतिकिलो ८ ते १० रुपयांवर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 3:28 am

Web Title: peas price drop in wholesale market dd70
Next Stories
1 पोलीस दलातील फक्त १३ जण उपचाराधीन
2 हस्तांतरणासाठी आता सिडकोबरोबर ‘संवाद’
3 अवघ्या १३ वर्षांत इमारत जीर्ण!
Just Now!
X