News Flash

उद्योगविश्व : औषधांच्या जगात..

जगात आज विविध प्रकाराच्या औषध उत्पादनांचा उद्योग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

उद्योजक : किशोर मसुरकर

औषध प्रिय कुटुंब असलेल्या मसुरकर कुटुंबातील तिसरी पिढीचा साक्षीदार निखील मसुरकर आणि त्याची पत्नी अंजूला मसुरकर सांभाळत आहे. या दोघांनी एम. फार्मा केले आहे. किशोर मसुरकर यांची मुलगी नवीताही लंडनमध्ये सध्या एका शासकीय रुग्णालयात औषध तज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. काही दिवसांनी तीही या व्यवसायाचा एक भाग होणार आहे. मसूरकर यांची पत्नी रीता मसुरकर या कंपनीचा प्रशासकीय जबाबदारीची धुरा वाहत आहेत. त्यामुळे अख्खे मसूरकर कुटुंब या औषध निर्मिती उद्योगात सक्रिय झाले आहे. ऑफ्तोल्मिक प्रकारातील औषधांची निर्मिती करणाऱ्या यन्टोडचा आलेख सध्या जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

जगात आज विविध प्रकाराच्या औषध उत्पादनांचा उद्योग तिसऱ्या क्रमांकावर आहे. वीस हजारांपेक्षा जास्त उद्योजक देशात उत्पादन घेत आहेत तर अडीचशे परदेशी कंपन्यांनी या उद्योगाचा ताबा केव्हाच घेतला आहे. अशा जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहणे तसे अवघडच. पण चाळीस वर्षांपूर्वी महीममधील आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकघरापासून मसूरकर कुटुंबाने सुरू केलेला यन्टोड फर्मासिटीकल लिमिटेडचा व्यवसाय आज लंडनमधील एका कार्यालयातून चालविला जात आहे. तीन पिढय़ांच्या परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या औषधनिर्मितीचा स्वानंद जगातील ५५ देशात वितरित होत आहे. त्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ४०० पेक्षा जास्त औषध विक्रेते आणि शंभर एक परदेशात या कंपनीची उत्पादने मोठय़ा अभिमानाने विकत आहेत. विशेष म्हणजे भारतातील फळ व भाज्याही पारखून घेणाऱ्या युरोप आणि लंडनमधील चौकस नागरिकांनी यन्टोडच्या औषधांना पसंती दिली आहे. पसाभर औषधनिर्मितीत हात न घालता नाक घसा कान विशेषत: डोळ्यांसाठी लागणाऱ्या औषधांची निर्मिती यन्टोड करीत आहे. या पंचेंद्रियांच्या पहिल्या अक्षरांवरून कंपनीचे यन्टोड असे काहीसे वेगळे नाव ठेवण्यात आले आहे. डोळ्यांच्या औषधांना महत्त्व देणाऱ्या यन्टोडचे मानचिन्हही कमळ आहे.

देशात फर्मासिटीकल व्यवसाय विस्ताराला मोठी संधी आहे. जगातील फायझर, ग्लॅक्सो, सोनाफी, मर्क, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, इली लिली, अ‍ॅबोटसारख्या बडय़ा कंपन्यांची मदार भारतातील छोटय़ा व मध्यम औषधनिर्मिती करणाऱ्या कारख्यान्यावर आहे. आपल्याला हवी ती औषधे तयार करून घ्यायची आणि त्यांची तपासणी करून आपल्या नावानिशी जगात विकायची असा हा आयजीच्या जिवावर बायजी उधार असलेला व्यवसाय सध्या जोरात आहे. अशा या स्पर्धेच्या युगात यन्टोडचे किशोर मसूरकर मात्र गेली चाळीस वर्षे चांगलेच पाय रोवून आहेत. त्यांचे वडील गुरुदास मसूरकर यांनी एका खासगी कंपनीतील नोकरीला रामराम ठोकून हा व्यवसाय १९७७ मध्ये सुरू केला. औषध कंपनीच्या दुनियेत क्रोसिन मॅन म्हणून ज्यांना ओळखले जाते ते हे गुरुदास मसूरकर. त्यांच्याच सृजनशीलतेची क्रोसिन ही आवृत्ती आहे. माहीम येथील गजानन सोसायटीच्या घरातील स्वयंपाकगृहातून या उद्योगाची सुरुवात झाली आहे. औषध विक्रेता परवानासाठी वेगळी जागा दाखवावी लागत होती म्हणून मसूरकर यांनी स्वयंपाकघराला वेगळा दरवाजा काढून औषध विक्रेत्याचा परवाना मिळवला.

पहिली सहा वर्षे याच घरातील कारखान्यातून देश विदेशात औषधे विकली गेली. त्यानंतर रबाले एमआयडीसीत जागा विकत घेऊन या कंपनीचा विकास केला गेला. याच लघुउद्योगाच्या जोरावर अंबरनाथ येथे वीस वर्षांपूर्वी दुसरा कारखाना सुरू करण्यात आला असून यन्टोड आता लंडनमधील कार्यालयातून जगातील निर्यात सांभाळत आहे. हे काम औषध प्रिय कुटुंब असलेल्या मसूरकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा साक्षीदार निखील मसूरकर आणि त्याची पत्नी अंजूला मसूरकर सांभाळत आहे. या दोघांनी एम. फार्मा केले आहे. किशोर मसूरकर यांची मुलगी नविताही लंडनमध्ये सध्या एका शासकीय रुग्णालयात औषधतज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. काही दिवसांनी तीही या व्यवसायाचा एक भाग होणार आहे. मसूरकर यांची पत्नी रीता मसूरकर या कंपनीचा प्रशासकीय जबाबदारीची धुरा वाहत आहेत. त्यामुळे अख्खे मसुरकर कुटुंब या औषध निर्मिती उद्योगात सक्रिय झाले आहे. ऑफ्तोल्मिक प्रकारातील औषधांची निर्मिती करणाऱ्या यन्टोडचा आलेख सध्या जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

या निर्मितीत बाप समजल्या जाणाऱ्या अ‍ॅलकॉन आणि अ‍ॅलरजॅन या अमेरिकन कंपनीनाही त्यांनी मागे टाकले आहे. त्यामुळे युरोप आणि लंडन मध्ये यन्टोड कंपनीची ऑफ्तोल्मिक उत्पादने डोळे बंद करून विकली घेतली जात आहेत. देशातील असा एकही डोळ्यांचा सर्जन नाही ज्याने यन्टोडचे उत्पादन प्रिसिकेप्शनवर लिहिलेले नाही असा दावा मसूरकर मोठय़ा अभिमानाने करीत आहेत. दीडशेच्या वर औषधांचे उत्पादन करणाऱ्या मसूरकरांची आर्थिक उलाढाल आता दीडशे कोटीच्या घरात गेली आहे. मुलगा, मुलगी आणि सून या सर्वानाच औषधाची आवड लागल्याने ही उलाढाल आता पाचशे कोटीच्या वर नेण्याची मसूरकर कुटुंबाची इच्छा आहे. केवळ उद्योग आणि उद्योग न करता मसूरकरांनी सामाजिक बांधिलकीदेखील जपली आहे. त्यामुळे इगतपुरीला हुतात्मा शर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चालण्यिात येणाऱ्या अपंग व कर्णबधिर शाळेतील मसूरकर यांचे योगदान मोठे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:31 am

Web Title: pharmaceutical business kishor masurkar medicine world
Next Stories
1 पोलीस ठाण्यांतील धार्मिक स्थळे हटवा
2 लाटांमुळे पिरवाडी किनाऱ्याची धूप
3 दर्याची ‘सुकी दौलत’
Just Now!
X