छपाई यंत्र उपलब्ध; फूलविक्रेत्याचे संशोधन

पूनम धनावडे , नवी मुंबई</strong>

navi mumbai police open gym marathi news
नवी मुंबई: सीबीडी पोलीस ठाण्यात ओपन जिमसह छोटेखानी कोर्ट, कामाच्या तणावात काही क्षण विरंगुळ्यासोबत व्यायामही 
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
22 stripes tigers spotted found in radhanagari wildlife
सिंधुदुर्ग-कोल्हापूर डोंगररांगांत २२ पट्टेरी वाघ!

आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण वेगवेगळ्या निमित्ताने नेहमीच पुष्पगुच्छ देत असतो. या पुष्पगुच्छावर जर त्या व्यक्तीचे छायाचित्र किंवा त्या निमित्ताने द्यावयाचा संदेश चित्रित केला असेल तर..होय, अशा प्रकाराचे अनोखे पुष्पगुच्छ नवी मुंबईतील खारघर येथे मिळत आहेत.

येथील फुलविक्रेते अशोक भानुशाली यांनी संशोधनातून हे आधुनिक तंत्र अवगत केले असून नैसर्गिकपणे आपले छायाचित्र व संदेशासहित गुलाबाचा पुष्पगुच्छ बनवून देत आहेत.

पुष्पगुच्छ देऊन स्वागत किंवा शुभेच्छा देण्याची आपली प्रथा आहे. पण त्याच त्याच प्रकारचे विविध फुलांचे लहान-मोठय़ा आकाराचे पुष्पगुच्छ असतात. मात्र यात नवीन ट्रेंड आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शुभेच्छा देताना त्या पुष्पगुच्छावर संबंधित व्यक्तीचे फोटो, विविध संदेश देता येत आहेत. यात १५ ते २० असे छायाचित्र असलेली फुले व विविध संदेश देण्यात येत आहेत.

या पुष्पगुच्छाची किंमत २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत आहे. तसेच ते टवटवीत ठेवण्यासाठी व्यवस्थित निघा राखली तर किमान १० दिवस टिकतात, असा दावा भानुशाली यांनी केला आहे.

आपण अनेक वस्तूंवर फोटो देऊन भेटवस्तू देत आहोत. पुष्पगुच्छ ही विविध कार्यक्रमांसाठी वापरले जातात. मग यावरच हे करता आले तर, असा विचार करून अभ्यास केला. फुलांची पाकळी नाजूक असते, त्यावर छायाचित्र कसे छापता येईल यावर संशोधन केले. चार वर्षे प्रयत्न केल्यानंतर तसे यंत्र उपलब्ध केले आहे.

– अशोक भानुशाली, पुष्पगुच्छ विक्रेता, खारघर