पर्यावरण दिनानिमित्ताने रविवारी उरण तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सामाजिक संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी विद्यालय, सार्वजनिक उद्याने तसेच घराच्या शेजारी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात तरुणांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला. उरणमधील सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे उरण परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती वा त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता.
यात सरकारने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यावरण दिना निमित्ताने उरण सामाजिक संस्थेने उरण शहरातील उरण नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात जांभूळ, आंबा, सोनचाफा, रेन ट्री, बदाम यांचे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, विलास गावंड, मंदार आसरकर, प्रशांत पाटील, वैभव पाटील, पंकज म्हात्रे, मयूर शिंदे, सचिन वर्तक आदीजण उपस्थित होते.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?