15 December 2017

News Flash

महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

दोन दिवसांपूर्वी हडकर याने अशाच प्रकारे ओरिएन्टलच्या एका तरुणीचा विनयभंग केला होता.

प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: August 8, 2017 3:44 AM

संतप्त तरुणीने थेट सानपाडा पोलीस ठाणे गाठून याविरोधात तक्रार दाखल केली होती.

सकाळी फिरायला जाताना महाविद्यालयीन तरुणींना धक्का मारून त्यांच्याशी लगट करणाऱ्या चंद्रकांत हडकर (५६) नामक व्यक्तीला सानपाडा पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्य़ाखाली अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू असून चंद्रकांत हडकर विरोधात पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

सानपाडा येथे राहणारा चंद्रकांत हडकर हा दररोज सकाळी सानपाडा रेल्वे स्टेशनलगतच्या ओरिएन्टल कॉलेजजवळ फिरायला जात असे. याच वेळी सकाळच्या सत्रात ओरिएन्टल कॉलेजमध्ये जाण्यासाठी सानपाडा रेल्वे स्टेशनपासून अनेक तरुण-तरुणी येतात. या वेळी चंद्रकांत हडकर हा तरुणींना जाणीवपूर्वक धडक देत त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने त्यांना स्पर्श करत होता. हाच प्रकार शनिवारी सकाळीदेखील झाला होता. त्यामुळे संतप्त तरुणीने थेट सानपाडा पोलीस ठाणे गाठून याविरोधात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरून पोलिसांनी हडकर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हडकर याने अशाच प्रकारे ओरिएन्टलच्या एका तरुणीचा विनयभंग केला होता. त्यामुळे सदर तरुणीनेदेखील सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

First Published on August 8, 2017 3:44 am

Web Title: police arrested 56 year old for molesting college girl in sanpada
टॅग Girl Molestation