30 May 2020

News Flash

अत्याचारी सावत्र बापाला अटक

दोन वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला घणसोली येथून अटक करण्यात आली आहे

दोन वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला घणसोली येथून अटक करण्यात आली आहे. अब्दुल खान असे या अत्याचारी व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला नवरा सोडून गेल्याने पीडित मुलीची आई अब्दुल याच्यासह घणसोली येथे राहते. सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीची आई काही कामानिमित्त बाहेर गेली असता खान याने झोपलेल्या या मुलीवर शारीरिक अत्याचार केले. या मुलीची आई घरी परतल्यावर तिला आपल्या मुलीच्या अंगावर रक्ताचे डाग दिसले, तिने याबाबत जाब विचारला असता अब्दुलने उडवाउडवीची उत्तरे दिली. मुलीवर प्राथमिक उपचार करून या महिलेने मंगळवारी सकाळी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अब्दुलला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2015 7:22 am

Web Title: police arrested step father who rape with her two years old girl
Next Stories
1 रक्तचंदन तस्करांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
2 नवरात्रोत्सवाच्या खरेदीला उधाण
3 दिघ्यातील रोष मावळला
Just Now!
X