News Flash

स्वागतोत्सुकांवर पोलिसांची करडी नजर

नववर्षांच्या स्वागतासाठी उरण तालुका आणि परिसरातही जोरदार तयारी सुरू

नववर्षांच्या स्वागतासाठी उरण तालुका आणि परिसरातही जोरदार तयारी सुरू झाली असून वेगवेगळे बेत आखले जात आहेत. या स्वागत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यासाठी उरण पोलिसांनी योजना आखली असून कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नववर्षांच्या स्वागतासाठी मद्य पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर तसेच डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत नाचणाऱ्यांवर बंधने येणार आहेत.
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेक गट तसेच सोसायटय़ा कामाला लागल्या आहेत. या दिवशी जास्तीत जास्त ग्राहक यावेत याकरिता उरणमधील हॉटेल व्यावसायिकांनीही योजना आखल्या आहेत. उरणला समुद्रकिनारा लाभल्याने दरवर्षी उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर हजारो पर्यटक नववर्षांचे स्वागत करतात. या धुंदीत काही अनुचित घटनाही घडत असल्याने कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे. नववर्षांचे स्वागत करताना इतरांना उपद्रव होईल अशा आवाजात गाणी लावू नयेत, दारू पिऊन धिंगाणा घालू नये व वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे नाचगाणी करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 9:40 am

Web Title: police dogwatch on new year celebration
टॅग : Celebration,Uran
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे विकासकांमध्ये चैतन्य
2 अर्थशास्त्र, मराठीत उरणच्या कन्यांना सुवर्णपदके
3 अपुऱ्या पावसामुळे नवीन नळजोडणी बंद
Just Now!
X