News Flash

श्रेयासाठी नेत्यांमध्ये चढाओढ

सर्वच पक्षांचे राजकीय नेते फलकबाजी करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे.

 

दिघा अनधिकृत इमारती प्रकरण

दिघा परिसरात एमआयडीसी आणि सिडकोच्या जागेवर वसलेल्या ९९ अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू असताना लोकप्रतिनिधींनी मात्र न्यायालयाचा अवमान करणारी फलकबाजी आरंभली आहे. ही बांधकामे तोडण्यास स्थगिती देण्याचे निर्देश देत सरकारने न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचना विधान परिषदचे उपसभापती वसंत डावखरे यांनी विधिमंडळात केली आहे. मात्र सरकारने याविषयी कोणताही निर्णय घेतला नसून न्यायालयात भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून उर्वरित कारवाईला सुरुवात होणार असे संकेत एमआयडीसी व सिडकोच्या आधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असताना सर्वच पक्षांचे राजकीय नेते फलकबाजी करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाच्या नगरसेविका उज्ज्वला विकास झंजाड व शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका शुभांगी जगदीश गवते यांनी अशी फलकबाजी केली आहे. तर नवीन गवते आणि अपर्णा गवते, दीपा गवते यांनी  दिलेले निवेदन समाजमाध्यमांवर झळकावले आहेत. पाडकामाची कारवाई अटळ असल्याने रहिवाशांची समस्या आपण दूर केल्याचा या लोकप्रतिनिधींचा दावा पोकळ ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2016 4:11 am

Web Title: political leader competition to take credit from digha civilians
Next Stories
1 बनावट मद्य बनविणाऱ्या दुकलीला तळोजा येथून अटक
2 नवी मुंबई विमानतळ निविदा प्रस्तावाला चार दिवसांत मंजुरी
3 सिडकोच्या रडारवर एक हजार बेकायदा बांधकामे
Just Now!
X