News Flash

फलकबाजीने शहराचे विद्रुपीकरण

अनधिकृत फलकांमुळे रस्त्यांचे विद्रुपीकरण झाले आहे.

खारघर सेक्टर-१९ मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले फलक .        छाया : नरेंद्र वास्कर 

पनवेलमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात रस्तोरस्ती उभारलेल्या अनधिकृत फलकांमुळे रस्त्यांचे विद्रुपीकरण झाले आहे. सिडको प्रशासनाकडून कोणतीही रीतसर परवानगी न घेता हे फलक उभारले जात आहेत. या फलकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचे आयोजक राजकीय नेत्यांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रायोजकत्व घेत आहेत. यातून या मंडळांना उत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात महसूल मिळत आहे. याबदल्यात सदर राजकीय नेत्यांची नावे गणेशोत्सव मंडळांच्या फलकांवर झळकत आहेत. मात्र असे फलक उभारण्यासाठी या मंडळांनी सिडकोकडून कोणतीही परवानगी घेतली नाही तसेच सिडकोकडे फलकांसाठीचा महसूलही जमा केला नाही. या फलकबाजीतून प्रसिद्धी मिळवण्यासाठी वसाहतीमधील मुख्य चौक, प्रवेशद्वार यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत.

सिडको वसाहतींच्या परिसरात फलक उभारण्यासाठी फलक किती दिवस असावेत, यात सामान्यांची सुरक्षितता अशा कोणत्याही निकषाची माहिती न घेता हे फलक उभारण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत सिडकोच्या मुख्य बांधकाम अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही सर्व फलकबाजी बेकायदा असून २० सप्टेंबपर्यंत हे सर्व फलक आयोजकांनी न काढल्यास हे फलक सिडकोच्या वतीने जप्त करण्यात येतील असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:46 am

Web Title: political party banner advertisement at ganesh chaturthi
Next Stories
1 तरुणाईच्या उत्साहाचे ढोल निनादणार
2 सहा कोटींच्या विकास कामांना स्थायी समितीत मंजुरी
3 ‘लक्ष्मणरेषा’ न ओलांडण्याची दक्षता
Just Now!
X