27 May 2020

News Flash

CoronaVirus : करोनाबाधित महिलेची प्रसूती यशस्वी

आईला करोनासंसर्ग असल्याने बाळ तिच्यापासून अलग ठेवणार असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : घणसोली येथील एक गरोदर महिलेला करोना संसर्ग झाल्याचे रविवारी समोर आले होते. या महिलेची प्रसूती सोमवारी वाशीतील पालिका रुग्णालयात यशस्वी झाली असून बाळ व आईची प्रकृती चांगली असल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आईला करोनासंसर्ग असल्याने बाळ तिच्यापासून अलग ठेवणार असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या आठवडय़ात नवी मुंबईतील करोनाच्या वाढते रुग्णांमुळे प्रशासनाबरोबर नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यात सोमवारी दोन घटना या दिलासादायक घडल्या. एक म्हणजे सोमवारी दिवसभरात एकाही नव्या रुग्णाची वाढ झाली नाही व दुसरी म्हणजे करोनाबाधित महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी सांगितले की, प्रसूती शस्त्रक्रिया करून करण्यात आली असून बाळाचे वजन २.४ किलोग्रॅम आहे. बाळाला अतिदक्षता विभागात बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाळ कोरोनाबाधित आहे किंवा नाही हे अद्याप समोर आलेले नसून त्याच्या चाचणीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.  बाळाच्या आईचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्यानंतरच बाळाला आईकडे देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:26 am

Web Title: pregnant woman suffering from coronavirus successfully deliver baby girl zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 एपीएमसीत फळांची विक्री घटली
2 अडीच हजार कामगारांची भोजन व्यवस्था
3 गृहनिर्माण संस्थांची काळजी घेण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची
Just Now!
X