News Flash

तळोजातील घनकचरा प्रकल्पांच्या प्रदुषणाविरोधात कीर्तनकारांचा लढा

तळोजा औद्यागिक वसाहतीत ७० एकर जागेवर गेल्या १४ वर्षांपासून कंपनीचा घनकचरा प्रकल्प सुरू आहे.

सिडको प्रशासनाचा नागरी घनकचरा व्यवस्थापनामुळे होत असलेल्या घुसमटीबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत आपली आंदोलनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदुषणामुळे तूर्भे, घोट, कोयनावेळे, तळोजा मजकूर या चार ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांचे आयुष्यमान कमी होत आहे. बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे, असा आरोप करीत चारही ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी संघटित होऊन या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारकरी सांप्रदायातील किर्तनकारांच्या माध्यमातून सोमवारी यासंदर्भात भोईरवाडा येथे ग्रामस्थांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आणि सिडको प्रशासनाचा नागरी घनकचरा व्यवस्थापनामुळे होत असलेल्या घुसमटीबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत आपली आंदोलनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली.
तळोजा औद्यागिक वसाहतीत ७० एकर जागेवर गेल्या १४ वर्षांपासून कंपनीचा घनकचरा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणाने येथील शेतीचे मोठे नूकसान झाले आहे. नद्यांचे पाणी प्रदूषित होऊन थेट मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत. पाणी आणि हवा प्रदूषणामुळे विविध आजारांचा प्रादूर्भावही झाला आहे. बालकांच्या आजारपणाचे व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही भोईरपाडालगत आणखी ३० एकर जागेवर नव्याने रासायनिक कचऱ्याचे विघटन प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे तूर्भे, घोट, कोयनावेळे, तळोजा मजकूर या चारही ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून या कंपनीच्या या प्रकल्पाविरोधात ते संघटित झाले आहेत. येथील वारकरी सांप्रदायातील किर्तनकारांच्या माध्यमातून सोमवारी याबाबत बैठक घेऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा ठरावच ग्रामस्थांनी केला आहे. प्रकल्पाचे काम सुरू राहिल्यास तालुक्यातील वारकरी येथे किर्तनकार बंडातात्या कराडकर आणि अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे करु, असा इशारा किर्तनकार धनाबुवा यांनी यावेळी दिला. दरम्यान, कंपनीचा महाड येथील नवीन प्रकल्प तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्याने ठप्प झाला असून सिद्धीकरवले, घोट, भोईरपाडा, तळोजा मजकूर, कोयनावेळ व पिसार्वे या सहा गावातील ग्रामस्थानी या प्रदूषणाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदुषणामुळे परिसरातील चार ग्रामपंचायतींनी कारखान्यातील प्रदुषणाविरोधात घेतलेला ठराव लवकरच पनवेलचे प्रांतधिकारी भरत शितोळे यांच्याकडे ग्रामस्थांची संघर्ष समिती सुपूर्द करणार आहे.

आरोप चूकीचे, प्रदूषण नाहीच..
ग्रामस्थांनी केलेले प्रदुषणाचे आरोप चूकीचे आहेत. आमची कंपनी प्रदुषणावर मात करण्याचे काम करते. येथे प्रदुषण निर्माण होण्याचे कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानूसार रासायनिक कचऱ्याचे विघटन करण्याचे काम आमची कंपनी करते. जुन्या जागेची क्षमता संपत चालल्याने नवीन जागेत प्रकल्प उभारण्याचे काम नूकतेच सूरू केलेले आहे. ते बंद होणार नाही. कंपनीच्यावतीने ग्रामस्थांना विश्वासात घेण्याचे अनेकदा प्रयत्न केले आहेत. अजूनही आमची समन्वयाची भूमीका आहे.
दिनकर आढाव, व्यवस्थापक, मुं.वे.मॅ. कंपनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 12:23 am

Web Title: psalmodist fight against pollution of solid waste projects in taloja
Next Stories
1 फेरीवाला परवाना मराठी बेरोजगार तरुणांना देण्याची मागणी
2 नवीन नियम मच्छीमार व्यवसाय बंद पाडणारा
3 उरणमध्ये राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलन
Just Now!
X