16 October 2019

News Flash

लहान मुलांमध्ये ‘पब्जी पिचकारी’ची क्रेज

होळीची बाजारात लगबग; नैसर्गिक रंगाने बाजारपेठा फुलल्या

पब्जी पिचकारी

होळीची बाजारात लगबग; नैसर्गिक रंगाने बाजारपेठा फुलल्या

नवी मुंबई : होळी व धूलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात रंग पिचकारीने बाजारपेठ रंगली आहे. रंगपंचमीनिमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.

वाशीतील घाऊक बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकऱ्यांनी बाजारपेठ फुलली आहे. याच्या खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांच्या झुंबड उडाली आहे. येथील बाजारात नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील ग्राहक स्वत:त घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येत असतात. बाजारात रंगाचे, पिचकाऱ्यांचे दर तेवढेच असून नैसर्गिक रंगाला अधिक मागणी आहे. नैसर्गिक सुखे रंग ८० ते १०० रुपये तर ओले रंग १८० रुपयांवर उपलब्ध आहेत.

१९० ते ५०० रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची क्रेज लहान मुलांमध्ये असते. यंदा मात्र पब्जी या खेळाची पिचकारी उपलब्ध असून लहानग्यांमध्ये याची अधिक क्रेज आहे. विविध डिझाइनच्या पिचकारी ८० ते ४५० रुपयांवर तर पबजी पिचकारी १९० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू असून ग्राहक नैसर्गिक रंगाला अधिक पसंती देत आहेत. त्याचबरोबर लहान मुले पबजी पिचकारीची मागणी करीत असतात. दररोज ३० ते ४० पबजी पिचकऱ्यांची विक्री होते.

-विष्णू पटेल,  विक्रेता, वाशी बाजार

First Published on March 13, 2019 2:33 am

Web Title: pubg pichkari craze in kids