21 February 2019

News Flash

पुण्याच्या पर्यटकाचा  दरीत पडून मृत्यू

वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये विविध स्तरांवर प्राधान्य मिळविणाऱ्या चेतन यांना पर्यटनाची आवड होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

गिर्यारोहणाची आवड असलेल्या पुणे येथील चेतन धांडे (२६) यांचा शनिवारी पनवेल येथील माचीप्रबळ गडावर चढाई करताना चारशे फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. माची प्रबळगडावरील आदिवासी तरुणांनी आणि निसर्गमित्र पनवेल या संस्थेच्या स्वयंसेवकांनी चेतनचा शोध घेण्यात पोलिसांना मदत केली. परदेशात शिक्षण, क्रीडाक्षेत्र व व्यवसायात यश मिळाल्यानंतर चेतन यांना भारतात उद्योग सुरू करायचा होता. वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये विविध स्तरांवर प्राधान्य मिळविणाऱ्या चेतन यांना पर्यटनाची आवड होती. या आवडीमुळे चेतन मालविका कुलकर्णी या मत्रिणीसोबत माची प्रबळगडावर चढाईसाठी आला होता. गड चढण्यास सुरूवात झाल्यावर दोघेही कलावंतीण दुर्गावर चढताना चेतनचा तोल गेला आणि तो सुमारे चारशे फूट  खोल दरीत चेतन पडला.

First Published on February 11, 2018 1:50 am

Web Title: pune tourist death after fall into deep valley