News Flash

पारसिक डोंगराचा प्रश्न गंभीर

दिघा ते शिरवणे पर्यंत एकूण ४७ झोपडपट्टी वसाहती असून या वसाहतीमधून तीन लाख रहिवाशी राहात आहे.

पारसिक डोंगराचा प्रश्न गंभीर

२५ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाची गरज

नवी मुंबई : विविध प्रकारच्या बांधकामांसाठी उत्खन्नन करण्यात आलेले डोंगर अतिवृष्टीने भुसभुशीत होऊ लागल्याने दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नवी मुंबईतील पारसिक डोंगरही गेली अनेक वर्षे बांधकाम साहित्यासाठी पोखरण्यात आल्याने या डोंगराच्या पायथ्याशी वसविण्यात आलेल्या अनेक रहिवासी वसाहतींना धोका निर्माण झाला आहे.

दिघा ते शिरवणे पर्यंत एकूण ४७ झोपडपट्टी वसाहती असून या वसाहतीमधून तीन लाख रहिवाशी राहात आहे. यातील २०-२५ हजार रहिवासी हे या डोंगराच्या जवळपास राहात असल्याने त्यांचे इतरत्र पुर्नवसन करण्यात यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.

नवी मुंबई शहर निर्माण करताना लागणारे बांधकाम साहित्य जवळच तयार व्हावे यासाठी पारसिक डोंगराच्या दिघा ते शिरवणे या भागात १०३ दगडखाणीचे परवाने देण्यात आले. पण यामुळे या भागाची भरून न येणारी पर्यावरण हानी झाली आहे. या दगडखाणींवर काम करणारे विविध मजूर व कामगारांच्या वसाहती याच भागात निर्माण झालेल्या आहेत. यात काही लोकप्रतिनिधींच्या ‘वोट बँक’देखील असल्याने त्यांच्यावर कारवाई केली गेलेली नाही. एमआयडीसी व पालिकेने या उभ्या राहणाऱ्या बेकायदा वसाहतींकडे दुर्लक्ष केल्याने हे स्तोम आता शहरापर्यंत येऊन पोहचले आहे. यात पारसिक डोंगराच्या पायथ्याशी २०-२५ हजार रहिवाशांची लोकवस्ती तयार झाली आहे. यातील अनेक रहिवाशांना पारसिक डोंगराचा धोका निर्माण झाला आहे. पुण्यातील माळीण अथवा महाडमधील तळीये दुर्घटनेनंतर या पारसिक डोंगराच्या वसाहतींना असलेल्या धोक्याची चर्चा सुरू झाली आहे.

पालिकेकडून झोपडपट्टी पुर्नवसन?

दिघा येथील विष्णूनगर, रबाले येथील निब्बाण टेकडी, बेलापूर सिबिडी येथील आंबेडकर नगर व नेरुळ उरण मार्गावर पारसिक हिलच्या पायथ्याशी असलेल्या राहुल वसाहतीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यक्त केली आहे. या ठिकाणांची अभियंता विभागाने पाहणी केली असून खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. रहिवाशांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. विष्णूनगर मधील दोन घरामध्ये डोंगराची माती साचल्याचे निर्दशनास आले आहे. पालिका लवकरच वसाहतींसाठी झोपडपट्टी पुर्नवसन योजना राबविणार आहे.

नवी मुंबई क्षेत्रात डोंगराच्या पायथ्याशी बांधण्यात आलेली घरे ही मजबुरी म्हणून बांधण्यात आलेली आहेत. सिडकोची २०-२५ लाखांची घरे मजूर घेऊ शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे सिडकोने अशा अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वस्त घरांची उभारणी करणे गरजेचे आहे. तळीयेसारखी दुर्घटना घडल्यानंतर पुर्नवसन करण्याऐवजी सरकारने अगोदरच या रहिवाशांची

योग्य ठिकाणी पुर्नवसन करायला हवे. -भगवान केसभट, संस्थापक, वातावरण, पर्यावरण सामाजिक संस्था, महामुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 12:37 am

Web Title: question of the persian mountains is serious akp 94
Next Stories
1 महापे-पावणेतील रस्त्यांची दैना
2 करोना रुग्णदुपटीचा काळ तीन वर्षांपर्यंत
3 ‘नेट पॅक’ची पालिका विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
Just Now!
X