महानगरपालिकेच्या वाशीतील रुग्णालयात नागरिकांच्या रांगा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मोठय़ा प्रमाणात करोना संसर्ग वाढला असल्याने वाशी  महानगरपालिका रुग्णालयात कोविड चाचणीसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसातच उभे राहून नागरिकांना करोना  चाचणी करावी लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने याठिकाणी तात्पुरता शेड उभारावा, अशी मागणी होत आहे.

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णात वाढ होत आहे.  ९ हजार च्या वर करोना रूग्ण झाले आहेत.तर करोनामूळे ३०० च्या वर बळी गेले आहेत.  ही संख्या वाढत असून रोज नव नवीन संशयीत रूग्ण कोरोना चाचणी करतात. वाशी मनपा रुग्णालयात दररोज १०० नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी येत आहेत. ही चाचणी रुग्णालय इमारती बाहेर केली जाते,  आणि त्यासाठी बाहेर स्वॅब (नमुना) संकलन साठी एक केबिन बनवली आहे.मात्र सध्या पावसाळा सुरु असल्याने करोना चाचणीकरिता  येणारम्य़ा नागरीकांना त्याठिकाणी पावसापासून संरक्षण होण्यासाठी शेड उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रूग्णांना पावसातच करोना चाचणी करावी लागत आहे.

वाशी महापालिका रुग्णालयात कोरोना चाचणी साठी बाहेर नमुना संकलन केंद्र बनवले आहे. त्यामुळे  नागरीकांचे पावसापासून संरक्षण होण्याकरीता लवकरच त्या ठिकाणी नागरीकांसाठी पावसाळी शेड उभारण्यात येईल.

-प्रशांत जवादे, अधीक्षक वाशी पालिका रुग्णालय