News Flash

रबाळे तलावाला अवकळा

नवरात्रोत्सवातील देवींच्या मूर्तीचे मोठय़ा प्रमाणावर विसर्जन झाल्याने येथे निर्माल्यांचे ढीग पडले आहेत

तलाव व्हिजनअंतर्गत रबाळे येथील तलावांवर महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून त्यांचे सुशोभीकरण केल्यानंतरही या तलावांना अवकळा आली आहे. रबाळे येथील तलावात नवरात्रोत्सवातील देवींच्या मूर्तीचे मोठय़ा प्रमाणावर विसर्जन झाल्याने येथे निर्माल्यांचे ढीग पडले आहेत. हे निर्माल्य तलावातही टाकण्यात आल्याने पाणीही प्रदूषित झाले आहे.
सुशोभीकरण केलेल्या संरक्षण भिंतीच्या तसेच विद्युत खांबांना लांबच लांब दोऱ्या बांधून त्यांवर कपडे सुकवले जात असून अनेकदा कपन्यांच्या खासगी बस, रिक्षा तलावातील पाण्याने धुतल्या जातात. कपडे धुण्यामुळे तसेच पाण्यामध्ये निर्माल्य टाकल्यामुळे हे पाणी दिवसेंदिवस दूषित होत आहे.
या तलावात निर्माल्य, कचरा टाकू नये तसेच गाडय़ा वा कपडे धुण्यात येऊ नयेत, अशा आशयाचे फलक पालिकेने येथे लावले आहेत, तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र याचे सर्रास उल्लंघन होत असून पालिकाही त्याकडे काणाडोळा करीत आहे. या संदर्भात विभाग आधिकारी शंकर खाडे यांच्याशी संपर्क साधला असता तलावाची साफसफाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 7:49 am

Web Title: rabale lake of navi mumbai in bad condition
Next Stories
1 मजूर घटले, मजुरी वाढली, उरणमधील शेतकरी चिंताग्रस्त
2 अनियमित पाणीपुरवठय़ामुळे जेएनपीटीमधील नागरिक त्रस्त
3 आठवडा बाजार कारवाईपासून सुरक्षित
Just Now!
X