26 February 2021

News Flash

जुईनगर येथे रेल्वे फाटक उभारणार

फाटक नसल्याने जुईनगर येथे रेल्वे रुळावर झालेल्या अपघातानंतर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वे व पालिकेच्या बैठकीमुळे ७० कोटींचा उड्डाणपूल दृष्टिक्षेपात

फाटक नसल्याने जुईनगर येथे रेल्वे रुळावर झालेल्या अपघातानंतर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. दोन दिवसांच्या चर्चेनंतर येथे पालिकेने रम्बलर बसवले असून रेल्वेफाटक बसविण्यात येणार आहे. सुरक्षारक्षकही ठेवण्यात येणार आहे. हे काम रेल्वे करणार असून त्याचा खर्च पालिका देणार आहे. उड्डाणपूल बनवण्याचा आराखडा बनवण्याच्या कामालाही सुरुवात झाली असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे फाटकावर शनिवारी एनएमएमटी बस व सापनाडा रेल्वे सायिडग ट्रॅकवरून नेरुळकडे जात असलेल्या रेल्वेगाडीमध्ये अपघात झाला. त्यानंतर आरोप व प्रत्यारोपाला सुरुवात झाली असतानाच रेल्वेने या ठिकाणचा रस्ताच अनधिकृत व रेल्वेची पूर्वपरवानगी न घेता बांधला असल्याचा दावा रेल्वेने केला. शनिवारी सायंकाळी रेल्वेद्वारे येथील रस्ता खोदण्यासाठी पोकलेन व इतर यंत्रणा उपस्थित झाल्यानंतर स्थानिकांनी तीव्र विरोध केला. पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आले.

रविवारी सानपाडा कारशेड येथे रेल्वे, महापालिका अधिकारी, स्थानिकांमध्ये बैठक झाली. रेल्वेचे विभागीय अभियंता अर्पण कुमार, रेल्वे सीआरपीएफचे एम.के.राय, महापालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता मनोज पाटील तसेच विविध अधिकारी व स्थानिक ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे उपस्थित होते.

बैठकीत रेल्वेने या ठिकाणी फाटक तयार करावे, सुरक्षा गार्ड ठेवावा व त्याचा खर्च पालिकेने द्यावा हे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या सानपाडा व जुईनगर विभागाला जोडणारा उड्डाणपूल बनवण्याचा प्रस्ताव तत्वत: मान्य केला असून याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पुलासाठी अंदाजित ७० कोटींचा खर्च येणार असल्याचे पालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले.

रविवारच्या बैठकीत उड्डाणपूल करण्याचे पालिकेने मान्य केले असून रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी व्यक्त केला.

जुईनगर रेल्वे रुळावरून केलेला रस्ता महापालिका हद्दीत असून तो अनधिकृत असल्याचे रेल्वेने यापूर्वीच कळविले आहे. त्यामुळे पालिकेकडे पुलाची मागणी करावी असे रेल्वेला यापूर्वीच कळवले आहे.

-एस.के.चौटालिया, सिडको रेल्वे प्रकल्प मुख्य अभियंता.

एनएमएमटीच्या चालकाची हकालपट्टी

नवी मुंबईतील जुईनगर येथील फाटक नसलेल्या रेल्वे फाटकावर उपनगरीय रेल्वे आणि एनएमएमटीच्या झालेल्या अपघातप्रकरणी एनएमएमटी चालकास कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हा चालक कंत्राटी पद्धतीने काम करीत होता.

नवी मुंबईत जागोजागी चोख बंदोपस्त ठेवण्यात आला होता. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास जुईनगर येथील फाटक नसलेल्या रेल्वे फाटकावरून मार्ग क्रमांक १८ची एमएमएमटी जात असतानाच कारशेडमधून सानपाडा रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालेली उपनगरीय रेल्वेने एनएमएमटीला धडकली. एनएमएमटीच्या चालकाला लोकलचा अंदाज आला नाही.  लोकलने बसच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. या एनएमएमटीचा चालक राहुल गायकर याला अटक करण्यात आली होती. आज (सोमवारी) त्याची जामिनावर मुक्तता झाली आहे.

रेल्वेच्या रुळावरून जाण्याचा पहिला अधिकार हा रेल्वेचा असतो, या नियमानुसार बस चालक गायकर याची चूक गंभीर आहे, असा एनएमएमटी प्रशासनाने निष्कर्ष काढला आणि या चुकीमुळे त्याला काढून टाकण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:35 am

Web Title: railway gates will be set up at juinagar
Next Stories
1 खाद्यपदार्थासाठी दुभाजकातील खराब पाण्याचा वापर?
2 ५० गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
3 शेकडो किलो भाजी उकिरडय़ावर
Just Now!
X