News Flash

रेल्वे प्रवाशाला कारशेडमध्ये लुटले

युसुफ सय्यद असे फिर्यादीचे नाव आहे. तो वांद्रे येथे राहणारा असून सोमवारी खारकोपर येथे आला होता.

लोकलमध्ये झोपणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. नेरुळ येथे जाण्यासाठी तो लोकलमध्ये चढला, मात्र  लोकल नेरुळ स्टेशनमध्ये थांबून कारशेडला गेली आणि तेथेच त्याला दोन अज्ञातांनी माराहाण करीत त्याचा मोबाइल व इतर चिजवस्तू लुटून फरार झाले.

युसुफ सय्यद असे फिर्यादीचे नाव आहे. तो वांद्रे येथे राहणारा असून सोमवारी खारकोपर येथे आला होता. काम झाल्यावर खारकोपरहून घरी जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, खारकोपर येथून नेरुळला लोकल आली आणि या दरम्यान त्याला झोप लागली. सदर लोकल नंतर कारशेडकडे रवाना झाली, तरीही त्याला जाग आली नाही. त्याच ठिकाणी दोन अज्ञात लोकांनी झोपलेल्या युसुफ याला मारहाण करून त्याच्या कडील मोबाइल व एक पिशवी हिसकावून पळून गेले. त्यानंतर युसुफने नेरुळ रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली, अशी माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 1:48 am

Web Title: railway passenger robbed carshed akp 94
Next Stories
1 भूमिगत वीजवाहिन्यांचा धोका!
2 बेलापूर मतदार संघावरून युतीमध्ये धुसफूस?
3 पंधरा विद्युत बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत
Just Now!
X