26 May 2020

News Flash

सीवूड्समध्ये अळ्यांचा उपद्रव

तीन दिवसांपासून या अळ्या वाढल्या असून जास्त प्रमाणात त्या रस्त्यावर पडत होत्या, तर झाडांच्या फांद्यांवर मोठय़ा प्रमाणावर लोंबकळताना दिसत होत्या.

बेसुमार वाढीमुळे रस्त्यावरील झाडांवर शिरकाव; संपर्कात आल्याने अंगाला खाज

सीवूड्स रेल्वेस्थानक येथून सेक्टर ५०कडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडांवरून खाली पडणाऱ्या अळय़ांमुळे गुरुवारी घबराट उडाली. कोषातून बाहेर पडलेल्या या अळय़ा रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी तसेच दुचाकीस्वारांच्या अंगावर पडून त्यांना खाज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे अशा तक्रारी उद्भवू लागल्या. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने या प्रकाराची पाहणी केली तसेच पाण्याची फवारणी करून अळय़ांना प्रतिबंध घालण्यात आला.

सीवूड्स सेक्टर ५० कडे जाणाऱ्या या रस्त्यालगत तिवरांचे क्षेत्र आहे. या तिवरांतूनच अळय़ा उडून रस्त्यालगतच्या झाडांवर आल्या असाव्यात, असा अंदाज आहे. या अळ्यांना रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुरवंट या प्रकारातील या अळ्या खारफुटीवर आढळून येत आहेत. हा कालावधी त्यांच्या प्रजननाचा असल्याने तसेच खारफुटीची पाने हे या अळ्यांचे मुख्य खाद्य आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

तीन दिवसांपासून या अळ्या वाढल्या असून जास्त प्रमाणात त्या रस्त्यावर पडत होत्या, तर झाडांच्या फांद्यांवर मोठय़ा प्रमाणावर लोंबकळताना दिसत होत्या. रस्त्यावरील पदपथावर देखील यांचा खच पडलेला पाहावयास मिळत होता. खाडीलगत असलेली झाडे ही से.-५० येथील मुख्य रस्त्यावरच असल्याने ये-जा करणारे वाहनचालक, नागरिक यांच्या अंगावर त्या पडत होत्या.

अंगावर पडलेल्या अळ्या झटकताच अनेकांच्या अंगाला खाज येत होती. या वेळी घटनास्थळी पालिका वृक्ष प्राधिकरण व वनविभागाचे अधिकारी दाखल झाले होते. त्यांनी तातडीची उपाययोजना म्हणनू रस्त्यालगत लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली, तसेच अग्निशमन दलाने पाण्याची फवारणी करून अळ्यांचे प्रमाण कमी केले. सेक्टर ४८ येथील नंदन सोसायटी, जय गजानन, गुरुकृपा या सोसायटीलगत देखील तीच परिस्थिती पाहावयास मिळाली.

शहरात पहिल्यांदाच रस्त्यावर अळ्या आल्याचा प्रकार घडला आहे. त्या अंगावर पडल्याने खाज येत आहे.  गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू असून गुरुवारी अधिक प्रमाणात अळ्या आढळल्या आहेत. खाडीकिनारा अस्वच्छ असून त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. – फुलन शिंदे, रहिवासी, सीवूड

या अळ्यांचा हा प्रजननाचा कालावधी असून खारफुटी त्यांचे मुख्य खाद्य असल्याने या भागात त्यांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी विविध सूक्ष्म जीव, पक्षी, मासे असल्याने त्यांना कोणता धोका उद्भवू नये यामुळे या ठिकाणी कोणती औषध फवारणीदेखील करता येत नाही. १५ दिवसांनी यांचे प्रमाण कमी होईल असा प्राथमिक अंदाज आहे. – भालचंद्र गवळी, उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2019 1:37 am

Web Title: railway station road tree algae infestation akp 94
Next Stories
1 नाईक-म्हात्रे मनोमीलन नाहीच
2 शहर विकास आराखडय़ाला निवडणुकीनंतरचा मुहूर्त
3 नाईक यांच्या प्रचारावरून शिवसेनेत राजीनामानाटय़
Just Now!
X