24 January 2020

News Flash

नवी मुंबईला आणखी एक धरण

धरण १०० वर्षांपूर्वीचे असून त्याची सध्याची स्थिती पाहता विकत घेण्यासाठी ते आवाक्याबाहेरचे आहे.

दिघा धरण पालिकेला देण्यास रेल्वे तयार

नवी मुंबई : दिघा परिसरात इलठणपाडा हे ब्रिटिशकालीन धरण रेल्वे प्रशासन पालिकेस देण्यास तयार असून त्यांनी तसे पत्राद्वारे पालिका प्रशासनाला कळविले आहे. पालिकेने धरण घेण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असून तसे झाल्यास मोरबेनंतर नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे हे दुसरे धरण असेल. यामुळे दिघा व ऐरोलीतील पाणी समस्या कायमची सुटणार आहे. याबाबत पालिका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

दिघ्यानजीक इलठणपाडा येथे इंग्रजांनी हे धरण बांधले आहे. सध्या ते रेल्वेच्या ताब्यात आहे. सुमारे १५ दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता या धरणाची असून सध्या या पाण्याची रेल्वेला गरज नसल्याने या धरणाकडे दुर्लक्ष होत आहे. कोणती दुर्घटना होऊ  नये, तसेच ऐरोली, दिघामधील पाणी समस्या सोडविण्यासाठी धरण फायदेशीर ठरेल, यासाठी स्थायी समितीत हे धरण ताब्यात घ्यावे, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे या धरणाच्या सध्याची स्थितीबाबत विचारणा केली होती. त्यावर रेल्वेने पत्राद्वारे विचारणा केली आहे.

सद्य:स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय

धरण १०० वर्षांपूर्वीचे असून त्याची सध्याची स्थिती पाहता विकत घेण्यासाठी ते आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे पालिका हे धरण १ रुपये या नाममात्र दरात घेण्यास इच्छुक असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. पालिका धरण घेण्याआधी किंवा वापरात घेण्यासाठी धरणाचा दुरुस्ती खर्चाचा आढावा घेणार असून त्याची संरचना तपासणी केली आहे का? धरणाच्या दुरुस्तीचा खर्च, त्याच्या आजूबाजूला असलेले झोपडय़ांचे वास्तव्य याचा आढावा घेणार आहे. ही सर्व कामे रेल्वे प्रशासन स्वखर्चाने करून देणार आहे का? याचा सखोल अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने सांगितले.

पालिकेने धरणाची सध्याची असलेल्या स्थितीची विचारणा केली

होती, त्यावर रेल्वे प्रशासनाने धरण ताब्यात घेण्यासंदर्भात पत्राद्वारे विचारणा केली आहे. पालिका रेल्वे प्रशासनाकडे १ रुपये या नाममात्र दरात धरण देण्याबाबत मागणी करणार आहे. तसेच धरणाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन दुरुस्तीसाठी खर्च पाहूनच निर्णय घेतला जाईल.

– महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, मनपा

First Published on August 7, 2019 4:59 am

Web Title: railway to give digha dam to navi mumbai municipal corporation zws 70
Next Stories
1 महापेतील रस्त्यांची चाळण
2 पावसामुळे भाजीपाला, फळांची आवक घटली
3 राष्ट्रवादीची धडपड
Just Now!
X