15 July 2020

News Flash

वाशी एपीएमसीकडे किरकोळ विक्रेत्यांची पाठ

भीतीने माल खरेदीस टाळाटाळ; किरकोळ बाजारात कांदे, लसूण महाग

भीतीने माल खरेदीस टाळाटाळ; किरकोळ बाजारात कांदे, लसूण महाग

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून करोनाचे केंद्र ठरत असलेल्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठांमध्ये करोना संसर्गाच्या भीतीमुळे किरकोळ विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या बाजारात एरवीच्या तुलनेत ५० ते ६० टक्के किरकोळ व्यापारी खरेदीसाठी फिरकत असून यामुळे घाऊक बाजारात पुरेसा साठा असूनही मुंबई, ठाण्याच्या किरकोळ बाजारात मात्र जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. किरकोळ बाजारात कांदे, बटाटे आणि लसूण यांसारख्या कृषी मालाच्या

दरात यामुळे मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी आणि व्यापाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर करोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई शहरातील रुग्णांचा आकडा वाढण्यामागे या बाजारपेठा एक महत्त्वाचे कारण ठरल्या आहेत. मध्यंतरी ही वाढती ग्णसंख्या लक्षात घेऊ न काही काळासाठी या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागल्याने हा घाऊक बाजार पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र, एपीएमसीच्या आवारातील करोनाबाधितांच्या वाढत्या प्रमाणामुळे येथून माल खरेदी करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत किरकोळ विक्रेत्यांची वर्दळ निम्म्यावर आली आहे. यामुळे अनेक किरकोळ विक्रेत्यांकडे मालाचा तुटवडा भासू लागला असून यामुळे कृषी मालाचे दरही वाढू लागले आहेत. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील  घाऊक बाजारपेठेत प्रति किलो कांदा १० रुपयांनी विकला जात आहे. असे असताना मुंबई, ठाण्याच्या किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा २५ ते २८ रुपयांनी विकला जात असून यामागे मालाची टंचाई असे कारण दिले जात आहे. घाऊक बाजारात बटाटे १९ रुपयांनी विक्री होत असताना किरकोळीत मात्र ३० ते ३५ रुपयांनी विक्री सुरू आहे. ७५ रुपये किलोने विकला जाणारा लसूण किरकोळ बाजारात दुप्पट दराने थेट १६० रुपयांनी विक्री होत आहे.

‘खुल्या जागा बंद करा’

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील खुल्या जागेत ठेवलेल्या शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी या जागेतील व्यवसाय बंद करण्यात यावेत , अशी मागणी घाऊक फळ बाजाराचे उपसचिवांमार्फत करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पावसात खुल्या जागेत पावसाचे पाणी शिरून शेतमालाचे नुकसान झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:15 am

Web Title: retailers avoid buying goods from vashi apmc market zws 70
Next Stories
1 ‘सॅनिटायझर’मुळे आता त्वचारोगांची समस्या
2 नालेसफाईचे आव्हान; नवी मुंबई पालिकेकडे कर्मचारी, यंत्रणेची कमतरता
3 करोनामुक्तीचा दिलासा; आठवडाभरात २२०४ पैकी १३४६ जण बरे होऊन घरी
Just Now!
X