नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कांदळवनामध्ये डेब्रीज पडून कांदळवनाचा ऱ्हास होत असल्याने याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर कांदळवनात डेब्रीज टाकणाऱ्या वाहनांची छायाचित्रे पाठविणाऱ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
कांदळवनामध्ये डेब्रीज पडू नये यासाठी सर्व विभाग आधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
बेलापूर विभाग कार्यालयात धर्मेद्र गायकवाड १८००२२२३१२, नेरुळ विभागात उत्तम खरात १८००२२२३१३, तुभ्रे विभागात भरत धांडे १८००२२२३१४, वाशी विभागात महेंद्रसिंग ठोके १८००२२२३१५, कोपरखरणे विभागात बाळकृष्ण पाटील १८००२२२३१६, घणसोली विभागात शंकर खाडे १८००२२२३१७, ऐरोली विभागात महेंद्र सप्रे १८००२२२३१८, दिघा विभागात गणेश आघाव १८००२२२३१९ तसेच महापालिका मुख्यालयात १८००२२२३०९ व १८००२२२३१० या  क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत फलकबाजी व कांदळवनात डेब्रीज टाकतानाची छायाचित्रे ८४२२९५५९१२ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.