14 July 2020

News Flash

द्रुतगती महामार्गावरील विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

या मार्गावरील अपघातांमधील मृत्यूंचे सत्र सुरूच आहे.

आठवडय़ापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातावर राज्याच्या मंत्र्यांनी चिंता व्यक्त करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यावरही या मार्गावरील अपघातांमधील मृत्यूंचे सत्र सुरूच आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता तीन वाहनांच्या धडकेमुळे दोन जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मोहपाडा येथे राहणारे योगेश सुधाकर बागड (३२) आणि मिरारोड येथे राहणारे मोतीराम कुणाल घरती (३२) यांचा समावेश आहे. रविवारी दुपारी मुंबईच्या दिशेने येत असताना लोधिवली गावाजवळ द्रुतगती महामार्गावर स्विफ्ट, इको व्हॅन आणि इंडिका मोटार यांच्या एकमेकांच्या धडकेत ८ जण जखमी आणि दोन जणांचा मृत्यू झाला. स्विफ्ट मोटारीमध्ये  चालकासहीत ५ जण, इंडिका मोटारीत ३ जण व इकोव्हॅनमध्ये ५ जण प्रवास करत होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2016 2:50 am

Web Title: road accident in panvel 2
Next Stories
1 पोलीस भरतीतील लेखी परीक्षेत घोळ
2 उरणजवळ विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू, आठ जण जखमी
3 ४ हजार चालकांवर कारवाई
Just Now!
X