20 November 2019

News Flash

७५ वर्षीय चालकाचा बेदरकारपणा दोघांच्या जिवावर

मोटारीत बिघाड नसल्याचा प्रादेशिक परिवहनचा अहवाल

मोटारीत बिघाड नसल्याचा प्रादेशिक परिवहनचा अहवाल

कामोठे येथील बेदरकार वाहन चालवून दोन जणांना चिरडणारा आणि पाच जणांना गंभीर जखमी करणारा चालक हा अपघातानंतर थेट पनवेल येथील लाईफलाईन रुग्णालयात स्वत:हून उपचारासाठी दाखल झाला आहे. हरबिंदरसींग माथारु(वय ७५) असे या चालकाचे नाव असून तो मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संबंधित मोटारीची तपासणी केल्यानंतर संबंधित मोटार ही व्यवस्थित असून त्यामध्ये कोणताही बिघाड झाला नसल्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाचा आहे. मात्र संबंधित चालकाने भरधाव वेगात का मोटार दामटवली याचा शोध पोलीस घेत आहेत.

हरबिंदरसींग हा ७५ वर्षीय वृद्ध असून तो स्वत: रविवारी सायंकाळी स्कोडा मोटार भरधाव चालवित होता. वसाहतीमधील शिवसेना शाखेकडून सींग त्याच्याजवळील मोटार सेक्टर ६ च्या रस्त्यावरुन ‘जुई रेसीडेन्सी’ या इमारतीतीतल आपल्या घरी जात असताना सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हरबिंदरसींगच्या मोटारीचा वेग सुमारे शंभराहून अधिक असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले.

हरबिंदरसींग हा यापूर्वी पनवेल येथे राहत होता. त्याचा फेब्रीकेशनचा व्यवसाय होता. कर्करोगाच्या आजाराने त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तो एकटाच भाडय़ाने राहतो. पनवेल येथील स्वत:ची मालमत्ती विक्री केल्यानंतर मिळालेली रक्कमेच्या व्याजावर तो उदरनिर्वाह चालवित असे. जुई रेसीडेन्सी याच इमारतीमध्ये त्याचे भाऊ व इतर कुटुंबिय राहतात. ते कधीकधी त्याला जेवणाचा डब्बा देत असल्याचे पोलीस निरिक्षक मधुकर भटे यांनी सांगीतले. हरबिंदरसींग याने अपघातापूर्वी मद्यप्राशन केले होते का? तो एवढी भरधाव वेगात मोटार का चालवित होता याचे उत्तर अद्याप पोलिसांना मिळालेले नाही. लाइफलाइन रुग्णालयात अति दक्षता विभागात हरबिंदरसींग असल्याने त्याला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.

मुलाचा मृत्यू आई जखमी

रविवारच्या जबर अपघातामध्ये चोपडे कुटुंबीयांचे कुटुंबपण हरवून गेले. मटण खरेदी करण्यासाठी चोपडे पतीपत्नींसह दोन मुले घराबाहेर पडली होती. त्यातील सार्थकचे प्राण अपघातामध्ये गेले. मात्र मटण खरेदीसाठी दुकानावर वडिलांसोबत गेलेला त्यांचा दोन वर्षांचा मुलगा बचावला. सोमवारी साधना चोपडे यांच्या पायावर ओमसाई रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

First Published on July 23, 2019 2:31 am

Web Title: road accident mpg 94
Just Now!
X