पावणे एमआयडीसीतील ‘हिंदुस्थान प्लॅटिन’ या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी तब्बल दोन कोटी रुपये किमतीची २७५ किलो चांदी आणि चार किलो प्लॅटिनमची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. तुभ्रे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कामगारांनी गेल्या दोन वर्षांत ही चोरी केली आहे. ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्याचे सुरू करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. हा प्रकार सीसीटीव्हीत बंदिस्त झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल दिली होती.